ट्री गार्ड लावून वाढदिवस करण्यात आला साजरा…

    रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

 आज दिनांक ३ ऑगस्ट २०२४ शनिवारला, आमचे स्नेही मित्र मंदार उर्फ मनीष नाईक,(वाईड लाईफ ग्रुप सदस्य ), (ट्री फौंडेशन अध्यक्ष )वन्य जीव प्रेमी, एनजीओ , तथा भाजपा माजी उपाध्यक्ष तालुका चिमूर, यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून,मित्र परिवार तर्फे चिमुर  मुख्य हायवे रोड ला यापूर्वी ट्री फौंडेशन ग्रुप आणि नगरपरिषद द्वारा वृक्षारोपण करण्यात आले होते.

            परंतु वृक्ष उघड्यावर असंल्यामुळे बकरी जनावरे नासाडी करीत असे. त्यामुळे वृक्ष संगोपन व्हाव या संकल्पनेतून मित्र परिवार तर्फ वृक्षाना ट्री गार्ड लावून वाढदिवस साजरा करण्यात आला.

           सर्व मित्र परिवार तर्फे सांगता करण्यात आली. उपस्थित स्नेही मित्र श्री ज्ञानेश्वर उर्फ नानाभाऊ शिरभय्ये,श्री सुजित झुरमुरे,श्री मनोज शिरभय्ये,श्री प्रमोद दांडेकर, श्री राजू हेडाऊ, श्री जितेंद्र चिंचुलकर, श्री पराग लांबे, श्री महेंद्र कटारे, श्री रमेश खेरे, श्री प्रवीण काळे, श्री वैभव नेऊलकर,श्री सागर कावरे अन्य मित्र परिवार सर्वांनी वाढदिवसाच्या माध्यमातून मनिष नाईक यांना शुभेच्छा दिल्या.