भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेतील वर्ग खोल्या जलमय होत असल्यामुळे विद्यार्थांना बसवायचे कुठे ? असा यक्ष प्रश्न मुख्याध्यापक यांच्या समोर पडला आहे.
येथे वर्ग १ ते ७ वी मध्ये शिक्षण घेणारे १३१ च्या पटसंख्येत विद्यार्थी आहे. त्यांच्या शिक्षणासाठी साठी उपलब्ध असलेल्या जुन्या इमारतीचे स्लॅब पावसात गळते,तसेच खिडकीचे तावदाने मोडकळीस आल्यामुळे पूर्ण वर्ग खोल्यात पावसाचे पाणी साचते.
त्यामुळे विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था कुढे व कशी करावी याबाबत मुख्याध्यापक रेवनाथ चलाख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर कुमरे यांनी सरपंच शिवप्रसाद गवर्णा यांच्या मार्फतीने शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारती बाबत व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चे निवेदन गटशिक्षण अधिकारी प. स. धानोरा यांना सहा महिने आधी देण्यात आले होते.
त्यावर प. स. स्तरावरून नवीन इमारतीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.परंतु उन्हाळ्यात सदर नवीन इमारतीचे बांधकाम तांत्रिक अडचणी मुळे झाले नाही.
शाळापूर्व तयारी मध्ये उपलब्ध इमारतीची डागडुजी सुधा करण्यात आली नाही त्यामुळे वर्ग खोली, शिक्षक कक्ष, संगणक कक्ष, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख कार्यालयात पाणीच पाणी साचल्याने शालेय कामकाज कसे करावे, चिमुकल्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्थेचा कुठे करावी असा प्रश्न मुख्याध्यापक यांच्या समोर निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयी बाबत सरपंच शिवप्रसाद गवर्णा, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर कुमरे, ग्रा. प सदस्य अभिजित मेश्राम, ज्येष्ठ नागरिक शिवनाथ टेकाम, माजी ग्रा. प. सदस्य मुनिरभार्ई शेख,यांनी केंद्रप्रमुख सातपुते यांच्या उपस्थितीत शाळेला भेट दिली असता गळती होत असलेल्या स्लॅब चे पाणी बादलीत जमा करून विद्यार्थी बाहेर काढत असल्याचे चित्र दिसून आले.
यावर उपस्थित पदाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून सध्यापूर्ती प्रशासनाने त्वरित जीर्ण इमारतींची डागडुजी करून बैठक व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी केली आहे.