कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:- दिनांक 04/08/024 पासुन ११ अगस्त पर्यंत विविध कार्यक्रमा द्वारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रामटेक विधानसभा अंतर्गत येणाऱ्या पारशिवनी व कन्हान या प्रमुख शहरातून “भगवा सप्ताह”चा थाटात शुभारंभ करण्यात आला.सर्वप्रथम सभासद नोंदणी करून करण्यात आली.
यावेळी श्री.आशीर्वाद सावंत (सहसंपर्क प्रमुख),श्री.विशाल बरबटे (रामटेक विधानसभा प्रमुख),लोकेश बावनकर जिल्हा युवासेना प्रमुख,समिर मेश्राम जिल्हा कामगार सेना प्रमुख,दुर्गाताई कोचे महिला सेना जिल्हा प्रमुख,राधेश्याम हटवार,जिल्हा उपप्रमुख कैलाश खंडार तालुका प्रमुख,प्रेम रोडेकर,रमेश तादुळकर,प्रशांत लकडकर(विभाग प्रमुख),अश्विन कुसुंबे,किशोर चौधरी व रामटेक विधानसभेतील पक्षाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.