ब्रेकिंग न्युज… — वाघाने हल्ला करुन चौघांना केले गंभीर जखमी… — उरकुडपार,किटाडी,गरडापार गावा जवळील शेत शिवारातील घटना…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

 

चंद्रपूर/ चिमूर

            चिमूर तालुक्यातील उरकुडपार किटाडी,गरडापार गावातील शेत शिवारात आज दिनांक 4 जुलैला दुपारच्या सुमारास वाघाने चार शेतकऱ्यावर हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे.

              मन्साराम सावसागडे वय ५५ वर्षे राहणार किटाळी हा ठेक्याने शेती करत होता. दुसरा गटक्रमांक ११५ विनय शेकर नन्नावरे हा शेतात काम करीत होता. बालाजी गणपत नन्नावरे वय वर्षे ५२ राहणार गरडापार हा व्यक्ती घटनेच्या वेळी खसरा क्रमांक. १३५ येथे काम करीत होता. बाबाराव दडमल वय ४५ वर्षे राहणार ऊरकुडपार चौथा दामोधर नन्नावरे राहणार नवेगाव पेठ या चारही शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने पाडी पाडीने हल्ला करुन चौघांनाही गंभीर जखमी केले आहे.

           जखमी शेतकऱ्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे प्रथमोपचार करून तात्काळ नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. पट्टेदार वाघ अजूनही घटना स्थळीच असल्याचे मत उरकुडपार किटाडी,गरडापार येथील नागरीकांनी केली आहे.

           तरी वनविभागाने तात्काळ वाघाचा बदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली असून रुग्णालयात जखमी शेतकऱ्यांना बघण्याकरीता नागरिकांची बघ्यांची गर्दी होती.