अबोदनगो सुभाष चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
चिखलदरा तालुक्यातील मौजा दहेंद्री ढाणा येथील नागरिकांना उलट्या हगवन या साथीच्या रोगाची लागण झाली असल्याने आरोग्य यंत्रणेने द्वारा घरपोच उपचार करणे सुरू झाले आहे.
2 ऑगस्ट रोजी मौजा दहेंद्री ढाणा येथील नागरिकांना कॅलरा या साथ रोगाची लागण झाली होती.काल रात्रीपासून सदर गावात 20 ते 25 रुग्ण कॅलराग्रस्त निघाले असून,सर्व रुग्णांना ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.
अतिसंवेदनशील असलेल्या दोन रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे रेफर करण्यात आले आहे.तर तीन रुग्णांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे रेफर करण्यात आले आहे.
उर्वरित रुग्ण ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे उपचार घेत आहेत.दहेंन्द्री ढाणा या ठिकाणी साथ रोगाची लागण कशी कशामुळे झाली हे स्पष्ट होऊ शकले नाही.
ग्रामपंचायत मार्फत पाण्याचे क्लोरीफिकेशन्स करण्यात आले आहे अशी माहिती देण्यात आली आहे. दहेंद्री ढाना या गावाची लोकसंख्या 900 च्या जवळपास असून दुर्गम भागातंर्गत गाव समाविष्ट आहे.या ठिकाणी एक सार्वजनिक विहीर व दोन खाजगी विहिरी असल्याची माहिती आहे.