राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
तालूक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था येगंलखेडा येथील पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूकीत पोरेड्डीवार सावकार गटाने एकहाती वर्चस्व कायम ठेवत १३ पैकी १३ ही जागेवर विजय मिळवित विरोधी गटाला भूईसपाट केले. दि.२ आगस्ट शूक्रवार रोजी सकाळी ८ ते सांयकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली यानंतर लगेच मतमोजणी करीत सांयकाळी ६.३० वाजता निकाल घोषित करण्यात आला.
यावेळी सावकार गटाचे इतर मागास वर्गीय गटातून सूधाकर किरणापूरे अनूसूचित जाति जमाती गटातून प्रेमानंद तागडे महिला राखीव गटातून काशीबाई कूमरे व जयवंता नैताम भटक्या विमूक्त जाती जमाती गटातून उत्तम कोसरे बिगर आदिवासी कर्जदार गटातून राजेश आत्राम व रविन्द्र सेलोकर तर आदिवासी कर्जदार गटातून जितेंद्र कोडाप अंबरशहा पारसे मनोहर वड्डे तेजराव हलामी रतिराम हलामी व पितांबर होळी यानी विजय मिळविला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी श्रेणी १ सूशिल वानखेडे यानी जवाबदारी पार पाडली. नवनिर्वाचित संचालक मंडळाचे सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार व आमदार कृष्णा गजबे यानी अभिनंदन केले.
निवडणूकीत व्यूहरचणा व विजयाकरीता जिल्हा बैंकेचे संचालक खेमनाथ पाटील डोंगरवार मार्गदर्शनात गटनेते तथा येगलखेडाचे उपसरपंच रेमाजी किरणापूरे कृषी उत्पन्न बाजार समीतीचे उपसभापति व्यंकटी नागीलवार संचालक चांगदेव फाये नगरसेवक अॅड उमेश वालदे येगंलखेडा सरपंच सदानंद हलामी बांधगाव सरपंच किशोर राणे सदस्य लिलाधर बारसागडे तसेच सावकार गटाचा कार्यकर्तानी प्रयत्न केले निवडणूक परिणामाची घोषणा होताच गूलाल उधळत जल्लोष साजरा करण्यात आला.