चिमूर नगर परिषदच्या विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन संपन्न.. — डॉ.सतिष वारजूकरांनी नगरपरिषदेच्या सिओसह आमदाराच्या कारभाराचे काढले वाभाडे..

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

चिमूर –

       चिमूर नगरपरिषद झाली तेव्हा पासून अनेक समस्या आवासून उभ्या आहेत.मात्र त्या समस्यांची आज घडीला पूर्तता झाली नाही.फक्त विकासाच्या नावावर पोकळ बाता मारल्या जात असून आवश्यक विकासाकडे व नागरिकांच्या ज्वलंत समस्यांकडे लोकप्रतिनीधीचे दुर्लक्ष होत असल्याची खंत डॉ.सतिष वारजूकरांनी व्यक्त केली.

       शासनाचे लक्ष वेधन्यासाठी व नगर परिषद मधील मनमानी कारभार,तसेच चिमूर शहरातील अनेक मुद्दे जनतेसमोर आणण्याकरिता एक दिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ.सतिष वारजुकर यांच्या नेतृत्वात शुक्रवारला दुपारी चिमूर तहसिल कार्यालयासमोर करण्यात आले.

            चिमुर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या चिमुर वडाळा (पैकु),पिंपळनेरी,सोनेगांव (बेगडे),सोनेगांव (सिरास), खरकाडा,काग,बाम्हणी,शेडेगांव,केसलापुर,कवडशी या गावांचा समावेश आहे.

      नगर परिषदची स्थापना झाली व पहिली निवडणूक झाली, कार्यकाल संपला.मात्र चार वर्षापासून मुख्याधिकारी प्रशासक म्हणुन संपूर्ण कारभार पाहत आहेत.चिमुर नगर परिषदेतील भष्ट्राचाराकडे व मनमानी कारभाराकडे आमदार का म्हणून दुर्लक्ष करीत आहेत?हा प्रश्न जाणकार नागरिकांना व सुज्ञ राजकीय व्यक्तींना सहाजिकच पडतो आहे.

      चिमूर शहरात पुर्णतः अस्वच्छता आहे.पिण्याच्या पाण्याची पुरताता नागरिकांना केली जात नाही.शहरात कुठेही सावर्जनिक स्त्रि-पुरुष मुत्रीघर व सार्वजनिक शौचालय नाही.याकडे नगर प्रशासन व लोक प्रतिनीधीचे दुर्लक्ष होत आहे.

          शहर व ग्रामीण मध्ये 24 तासात 24 वेळा लाईन जाते त्यांचे काय? कुठे गेला 132 केव्हीचे सोंग? दोन वर्षापूर्वी फडणवीस चिमुर येथे आले होते तेव्हा आमचेकडे मास्टर प्लॅन तयार आहे.तो तर कार्यान्वीत केला नाही तर बंटी भांगडिया आमच्या डोक्यावर केस राहु देणार नाही.

      तो मास्टर प्लॅन म्हणजे चिमुरातील जुने चांगले रस्ते फोडुन नविन रस्ते तयार करणे होय का? या स्थितीमुळे स्वच्छतेचे बेहाल झाले आहेत याचे काय?असा प्रश्न डॉ.सतिष वारजूकरांनी उपस्थित करीत विविध समस्यांची चिरफाड केली.

        धरणे आंदोलनातंर्गत माजी आमदार तथा माजी खनिकर्म अध्यक्ष,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस डॉ.अविनाश वारजूकर,काँग्रेस ओबीसी सेलचे राज्य संघटक धनराज मुंगले,चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके,तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे,माजी तालुका अध्यक्ष संजय घुटके,प्रा.राम राऊत,चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगडे,खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांचे स्विय साहाय्यक राजेश चौधरी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी चिमूर नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारावर भाष्य केले.

         आंदोलन स्थळी कार्याध्यक्ष महिला कांग्रेस माधुरीताई रेवतकर,माजी पंचायत समिती सदस्य भावनाताई बावनकर,नजमा पठाण,शैनाज अन्सारी,सुरेखा शेंबेकर,शार्दुला पचारे,प्रा.चाफले,तालुका सरचिटणीस विलास मोहिनकर,श्री.रत्नाकर विटाळे,नागेंद्र चट्टे,चिमूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्री.विनोद ढाकुणकर,माजी शिवसेना पदाधिकारी अनिल डगवार,सरपंच रामदास चौधरी, शिवसेना पदाधिकारी मनोज तिजारे,काॅग्रेस पदाधिकारी विवेक कापसे,श्रिकांत गेडाम,प्रवीण वरगंटीवार,अक्षय नागरिकर,मिडिया प्रमुख पप्पु शेख,राजेंद्र लोणारे,एड.धनराज वंजारी,जाबीर कुरेशी,शंकरपूर ग्रामपंचायत सरपंच साईश वारजूकर,अरुण दुधनकर,नितीन कटारे,घनश्याम रामटेके,केशव वरखडे,पर्यावरण अध्यक्ष प्रदीप तळवेकर,रोहन नन्नावरे,यांच्या सह हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

        धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष श्रम घेतले.