चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधि भंडारा
साकोली :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा, तालुका क्रीडा संकुल समिती व साकोली तालुका बुद्धिबळ असोसिएशन तर्फे १४, १७ व १९ वर्षाखालील मुला – मुलींच्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन स्थानीय तालुका क्रीडा संकुलच्या हॉलमध्ये करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा संघटक शाहेद कुरैशी, तालुका संयोजक तुषार मेश्राम ,आरबीटर सागर साखरे तालुक्यातील सहभागी शाळेतील खेळाडू, विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शालेय स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी संयोजक मेश्राम यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. क्रीडा संघटक शाहेद कुरेशी यांनी सांगितले की, स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळविण्यात येतील, स्पर्धेचे नियम सांगून मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय अर्बिटर सागर साखरे यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन तिन्ही गटाच्या स्पर्धा सुरू केल्या.
१४ वर्षे मुलांच्या गटात यज्ञेश देशमुख ,शार्दुल अस्वले, अजिंक्य गजभिये, आकाश सिंग चव्हाण, कुशाल रहले, मुलींच्या गटात अनुष्का साहू, दुर्वांशा चव्हाण, खुशी ठाकरे ,पेहर जनबंधू ,१७ वर्ष मुलांच्या गटात स्मित भिमटे, दिशांत कापगते, अभिषेक ठाकरे, अविष्कार भुरे, पार्थ हाडगे तर मुलींच्या गटात अदिती साखरे, तानिया भुरे, ऋतुजा रहाटे, दीक्षा गुप्ता, खुशी रामटेके, १९ वर्ष मुलांच्या गटात रोहित लांजेवार, चैतन्य बडोले, सुयोग चिमणकर, साहिल नेताम ,सुबोध गणवीर यांची निवड जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात आली.
स्पर्धेत पंडित नेहरू विद्यालय सानगडी, वसंतराव नाईक विद्यालय चांदोरी, नवजीवन इंग्लिश स्कूल, अकॅडमी हाईट पब्लिक स्कूल ,कटकवार विद्यालय, एनपीके विद्यालय, मार्तंड पाटील कापगते विद्यालय, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय ,जिल्हा परिषद हायस्कूल सानगडी व साकोली येथील खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन जिल्हा क्रीडा अधिकारी लेकुरवाळे, तालुका क्रीडा अधिकारी चारुदत्त नाकत व सर्व शिक्षक पालक यांनी केले आहे.