एक दिवस मोदी – शहा यांचा अंत बेनिटो मुसोलिनी सारखा होईल… — उर्वरित भाग…

       भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्याचे स्वप्न दाखवणारे मोदी – शहा….

       विरोधीपक्ष व लोकशाही मुक्त हिंदुस्थान निर्माण करण्याचे महत्वाकांक्षी धोरणाचे स्वप्न पाहत आहे…

              2002 च्या गोध्रा हत्याकांडामुळे हात कलंकित झाल्यावर तत्कालीन प्रधानमंत्री अट्टलबिहारी वाजपेयी यांनी याच मोदीला ताकीद दिली होती की,”राजधर्म का पालन करो.”त्यावर याने निर्लज्जपणे प्रत्यूतर दिले होते की,”वही तो कर रहे है, साहब….!

          त्याचबरोबर एका तडीपार गुन्हेगाराला सोबत घेऊन याच मोदीने अखंड भारताचे तुकडे करण्याच्या दिशेने लोकशाहीतून ठोकशाही निर्मितीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सुरुवात केली.

            ज्याप्रमाणे हिटलर आणि मुसोलिनीची जोडगोळी जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहत होती.एकदा तर मुसोलीनीला अमेरिका,रशिया, इंग्लंड आणि फ्रांस या चार राष्ट्राच्या सैन्याने मिळून मोठ्या कष्टाने पकडून एका अज्ञात स्थळी उंच पहाडी गुहेत लपवून ठेऊन तिथून लगेच काही दिवसात त्याला इंग्लंडला हलविण्याचे प्रयत्न या चारही देशांचे चालू होते. हिटलरला त्याची चाहूलही लागू नये म्हणून या राष्ट्रानी रेडिओवरून उलट बातम्या प्रसारित केल्या……!

        परंतू हिटलर या सर्वाना भारी पडला.त्याने आपल्या मित्राला ( मुसोलिनीला ) सोडविण्यासाठी आपल्या कर्तबगार सहकाऱ्यावर ही जबाबदारी सोपवली.त्या सहकाऱ्याने जीवाची बाजी लावून निवडक सहकारी घेऊन,चार राष्ट्राच्या सैन्याच्या गरड्यातील संरक्षणात अज्ञात स्थळी असलेल्या मुसोलिनीला सोडवून हिटलरसमोर उभे केले…..!

        तेंव्हा हिटलर सुद्धा अचंबित झाला होता.त्यावर तत्कालीन इंग्लंडचे प्रधानमंत्री यांनी त्या सोडवणाऱ्याची प्रशंसा करताना म्हटले होते की,अशी जीवाची बाजी लावणारे सहकारी जर हिटलरसोबत असतील तर हिटलरची महत्वाकांक्षा का वाढणार नाही?

           परंतू,निसर्ग आणि नियती यांना सुद्धा अघोरी कृत्य मान्य नसते की,जे नैतिकतेच्या,निसर्गदत्त नियमांच्या विरुद्ध असते.पुढे अमेरिकेने मॅनहॅटन प्रोजेक्ट राबवून अणुबॉम्बची निर्मिती करून त्याची अंमलबजावणी करून दुसऱ्या महायुद्धाचा शेवट केला…..!

         त्याचबरोबर या जोडगोळीचा सुद्धा शेवट झाला….!

         याच दिशेने आमच्या देशातील ही जोडगोळी अती महत्वाकांक्षेनी झपाटून त्याच दिशेने मार्गक्रमण करताना दिसत आहे.

         कारण या जोडगोळीने 2014 ते 2019 या काळात RSS च्या सोबतीने प्रतीक्रांतीला सुरुवात केलेली आहे.प्रतीक्रांती ही नेहमीच निसर्गनीयमांच्या विरुद्ध असते.प्रथम विरोधकांचे पंख छाटणे,देशातील संपत्ती भांडवलदारांच्या ( मर्जिच्या ) हाती सोपवणे,संपूर्ण प्रशासनावर नियंत्रण ठेवणे,जनतेला धार्मिक कर्मकांडात गुंतवणे,लोकशाहीतील 5 वर्षानी येणाऱ्या निवडणुका EVM ला हॅक करून आपल्याच जागा जास्तीत जास्त निवडून आणण्याची व्यवस्था करणे,म्हणजेच साम,दाम,दंड आणि भेदाचा पुरेपूर लाभ उठवत प्रसंगी देशात अराजक्ता माजवत संपूर्ण सत्ता एकहाती घेण्याचा अट्टाहास ही मोदी – शहाची जोडगोळी करत आहे.हजारो वर्षांपूर्वीची शारीरिक व मानसिक गुलामी आणण्याचे काम ही जोडगोळी करत आहे.अशा काळात सदविचारी,मानवतावादी संघटनेने आपल्यातील गटा -गटाचे मतभेद विसरून,मरगळ आलेल्या लोकशाही व संविधानाला ICU तून बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करूया… 

        जर,तर,किंतु ,परंतू,या निगेटिव्ह पर्यायांना थारा न देता हे काम आपण केल्याशिवाय मरणार नाही,असा दृढसंकल्प आपण प्रत्येकाने करूया.त्यासाठी कोणत्याही अमिषाची अपेक्षा न ठेवता,निःस्वार्थपणे, त्याग,संघर्ष व समर्पनाच्या भावनेतूनच ते शक्य आहे…   

        तेंव्हाच कुठे आपल्याला यश येईल….

    आणि निश्चितच या जोडगोळीचा अंत सुद्धा बेनिटो मुसोलीनीसारखा झाल्याशिवाय राहणार नाही….!

        आमच्या देशात क्रांती घडूच शकत नाही असा जो शिक्का जगाने मारला आहे, तो शिक्का पुसून टाकण्याची हीच योग्य वेळ आहे…..!

           कारण,डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,” 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा.”

      तेंव्हाच आम्ही सुखी होऊन जगू शकतो..

          जागृतीचा लेखक

            अनंत केरबाजी भवरे

      संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689…