रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
चिमूर परीघावरील विद्यार्थांनी आपली वंचितता दूर करण्यासाठी मोठं मोठया विद्यापिठात जाऊन शिकण्याशिवाय पर्याय नाही. गावाखेड्यातील कुचकामी आणि दर्जाहीन शिक्षण घेऊन वंचित वर्गातील विधार्थ्यांचं काडीचाही फायदा होणार नाही आणि इथला वंचित,परीघावर असलेला वर्ग असं दर्जाहीन शिक्षण घेऊन मानवी आत्मसन्मान नसलेलं दर्जाहीन आयुष्य जगावं असं इथल्या जात,लिंग,वर्ग आधारित शोषणकारी व्यवस्थेला नेहमीचं वाटतं आलेलं आहे.
ही या व्यवस्थेला बदल म्हणून व्हिजन समोर ठेवून नेचर फाउंडेशन ग्रामीण भागात काम करत आहे.याचे बीज म्हणजे समीक्षा नन्नावरे चिमूर तालुक्यातील ग्रामिण भागातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण नसल्याने सर्व विद्यार्थी चिमूर येथे नेचर अभ्यासिकेत शिक्षण घेत असतात.
समीक्षा शंकर नन्नावरे मु.सोनेगाव(बे)ता.चिमूर जि.चंद्रपूर हिचे आई वडील शेतकरी आहेत समीक्षाचे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळेत झाले तर माध्यमिक नेहरू विध्यालय चिमूर व पदवी शिक्षण कमला नेहरू महाविद्यालय,नागपूर येथून पूर्ण केले.
त्यानंतर कोविड काळात नेचर फाउंडेशनच्या मोफत स्पर्धा परीक्षा शिकवणी वर्गात प्रवेश घेऊन नंतर यांच्या त्यासोबतच इतर सामाजिक कार्यात आवड म्हणून नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरण,एक रोपटं जन्म दिवसाच या उपक्रमात विषयावर काम सुद्धा केले आहे.
ही सध्या पुणे येथे स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करीत असतानाच येथे आय.आय.टी हैद्राबाद एम.ए(डेव्हलपमेंट स्टडी) व आयआयपीएस मुंबई एम.ए ( पॉपूलेशन स्टडी) या करिता पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली याबद्दल नेचर फाउंडेशन चे संस्थापक निलेश नन्नावरे सर यांनी यात अर्ज करण्यास मार्गदर्शन केले.
यामध्ये एक जागे करिता तीन विद्यार्थीनी हजारो लेखी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून मुलाखतीस निवडण्यात आल्या होत्या.यात समीक्षा ची निवड करण्यात आली.समीक्षा ही कोणतेही महागडे पैसा ची शिकवणी वर्ग न लावता या आय.आय.टी हैदराबाद येथे एम.ए (डेव्हलपमेंट स्टडी ) मध्ये तीची मागील महीन्यात निवड झाली.
या निवडी नंतर आता तीची आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई(आयआयपीएस) येथे एम.ए(पापुलेशन स्टडी) करीता निवड झाली आहे. या ठिकाणीं निवड होणारी समीक्षा चिमूर तालुक्यांतील पहिली विद्यार्थिनी आहे.
शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी काम करताना त्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या संधी विषयी काहीच माहीत नाही.विद्यार्थ्यांमध्ये जसा माहितीचा अभाव आहे. तसच तो त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांमध्ये सुद्धा आहे.कारण त्यांच्या कुटुंबात तोच एक असतो जो पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करतो.
आमच्या विद्यार्थ्याला माहितीच्या अभावी या बारावी नंतर उत्कृष्ट शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेण्याचा विचारही डोक्यात येत नाही.मग तो “12 नंतर डिएड नंतर बीएड आणि नंतर एम एड” नाहीतर मग “12 वी नंतर बीए,एम ए,बीएड, एम एड” अशा शिक्षणाच्या पारंपरिक चौकटीत अडकून राहतो.
याही नंतर काय तर मग आणि घरच्यांना व नातेवाईकांना सांगण्यासाठी स्पर्धा परीक्षा” विज्ञान शाखेचे विद्यार्थी सुद्धा यापेक्षा फारसा वेगळा विचार करताना दिसत नाही. हेच तो का करतो? त्यांचा नेमका उद्देश काय? तर याचं उत्तर त्याच्याकडे नसतेच.
तळागळातील विद्यार्थ्यांना नामांकित संस्थांमधील गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या संधी काय आहेत? याची जागृती आणि मार्गदर्शन करण्यासाठी नेचर फाउंडेशन संस्था गेल्या चार वर्षांपासून ग्रामीण भागात कार्यशाळा आयोजित करीत आहे.
यामुळे OBC,SC,ST,NT,VJ,NT,SBC या बहुजन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पारंपरिक शिक्षणाची चौकट मोडावी यासाठीच नेचर फाउंडेशन ग्रामीण भागात काम करत आहे.
या समीक्षाच्या प्रवेशाची ही चर्चा संपूर्ण चिमूर जवळील पदवी,पदव्युत्तर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी हैदराबाद नंतर आयआयपिएस मुंबई प्रवेश करिता आदर्श ठरली आहे.
नेचर फाउंडेशन विदर्भातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून लोकल टू ग्लोबल व ग्लोबल टू लोकल या थीम वर काम करून उच्च शिक्षणात देश स्वातंत्र्यनंतर ग्रामिण उच्च शिक्षणातील असणारी दुरी कमी करावी यासाठी कायमस्वरूपी अर्ज करून देण्यापासून तर कॉलेज,होस्टेल,प्रवेश मिळविण्यासाठी मोफत मार्गदर्शन व जबाबदारी घेऊन काम करीत आहे. याचाच फलित म्हणजे समीक्षा नन्नावरे आहे.अशी माहिती निलेश नन्नावरे संस्थापक नेचर फाउंडेशन यांनी दिली.
“मी या संधीचा पुरेपूर उपयोग करून,आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कार्य करण्याचा संकल्प केला आहे. मी माझ्या शिक्षणाच्या माध्यमातून नवीन दृष्टीकोन आणि उपाय शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहे.”
समीक्षा शंकर ननावरे आयआय पीएस,मुंबई निवड विद्यार्थी
“नेचर फाऊंडेशनच्या मार्गदर्शनात चिमूर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी विविध क्षेत्रात होत आहे. भविष्यात चिमूर महाराष्ट्रातील उच्च शैक्षणीक पहिला हब बनेल”.
निलेश नन्नावरे (संस्थापक नेचर फाउंडेशन)