रस्ता बांधकामाची चौकशी करावी या मागणीसाठी 21ऑगस्ट पासून उपोषण…

 युवराज डोंगरे/खल्लार 

           उपसंपादक

          दर्यापूर तालुक्यातील रस्ते बांधकाम व अकोला जिल्ह्यातील बांधकाम विभागामार्फत तालुक्यालगत झालेल्या रस्त्यांची निकृष्ट दर्जाचे काम झाले.

          असून रस्ते बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते राजकुमार घरडे यांनी केला. असून या संपूर्ण विषयाची चौकशी करावी या मागणीसाठी अमरावती जिल्हा बांधकाम विभाग व अकोला जिल्हा बांधकाम विभाग यांना रितसर तक्रारी दाखल केलेले आहेत.

           यासंबंधी बांधकाम विभाग दिरंगाई करत असल्याचा आरोप करत दिनांक 21 ऑगस्ट 2024 पासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचा पत्र घरडे यांनी विभागांना देण्यात आले आहे.

          दर्यापूर तालुक्यातील पेठ ईदबारपूर, कळाशी, गायवाडी यासह अकोला जिल्ह्यातील किनखेड, रुईखेड, पणज आधी गावातील रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले. असल्याचा त्यांचा आरोप आहे या रस्ते बांधकामात कंत्राटदारांनी मनमानी पद्धतीने काम केले असून नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे.

            अधिकारी व कर्मचारी यांनी या बांधकामात लक्ष दिलेले नसण्याचाही आरोप राजकुमार घरडे यांनी केला आहे या संपूर्ण विषयाची चौकशी करून दोषींना कठोर शासन करण्यात यावे. अशी मागणी राजकुमार घरडे यांनी करत दिनांक 21 ऑगस्ट पासून उपोषणाला बसणार असल्याचा अल्टिमेटम दिला आहे.