ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली :- नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळविणारच” असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे एक तेजस्वी बाणेदार म्हणजेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लेखनातून व गीतांमधून अन्यायाची जाणीव करून देणारे बहुजनांचा बुलंद आवाज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंतीचा कार्यक्रम विद्यालयात घेण्यात आले.
यावेळी नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापिका आर.बी.कापगते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. के.जी. लोथे ,प्रा.स्वाती गहाणे, प्रा. वाय.बी.कापगते ,प्रा.एस.ए. कापगते, डी.एस.बोरकर, एम.एम.कापगते यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे आर. व्ही. दिघोरे यांनी केले. याप्रसंगी प्रा. के.जी. लोथे ,प्रा.स्वाती गहाणे, डी.एस.बोरकर, एम.एम.कापगते यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा विविध गीत,भाषणे सादर केलेत.
याप्रसंगी तालुका क्रीडा बुद्धिबळ स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता प्रा. वाय.बी. कापगते, प्रा.एस.ए.कापगते, डी.डी. तुमसरे, के.एम. कापगते, एस.व्ही. कामथे, मीना शिवणकर, वेणू निखारे,बबली लांजेवार , सोनाली क-हाडे, डी.आर.देशमुख, आर. सी. बडोले ,एल.एस. गहाणे, एस.आर.देशमुख, आर.के.खोटेले,गोपाल न्यामुर्ती व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.