पंकज चहांदे
प्रतिनिधि
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काॅंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विचारधारेतुन आलेल्या भाजपचे खासदार अनुराग ठाकुर यांनी खासदार राहुलजी गांधींची जात विचारून त्यांचा अपमान केला आहे.
त्यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या मनुवादी भाजप विरोधात व भाजप खा.अनुराग ठाकुरच्या निषेधार्थ देसाईगंज येथील फवारा चौकात काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकर यांच्या नेतृत्वात खा.अनुराग ठाकुर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला देसाईगंज तालुका काँग्रेसच्या वतीने जोडेमारो आंदोलन करून जाहिर निषेध करण्यात आला.
संपुर्ण देशात जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलल्या जात असुन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना समान न्याय मिळावा करीता काँग्रेस पक्षाच्या वतिने विरोधीपक्ष नेते तथा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेत मुद्दा लावून धरला असता धर्मनिरपेक्ष असलेल्या संसदेत भाजपाचे खासदार अनुराग ठाकुर यांनी राहुल गांधी यांना त्यांची जात विचारून अपमान केला.
एवढेच नाही तर देशातील कोट्यावधीची मागणी असलेल्या मुद्दयाला बगल देत राहुल गांधी यांचेवर जात विचारून वैयक्तिक टिका केल्याने देशातील कोट्यावधी लोकांचा अपमान केला आहे.
यावरून जातीयवादी भाजपाला जातनिहाय जनगणना करून देशातील नागरीकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊच द्यायचे नसल्याचे स्पष्ट होत असुन मुठभर मनुवादी विचारधारेच्या लोकांच्या हातात सर्व अधिकार अबाधित ठेवायचे असल्याचे दिसून येते.
हा येथील बहुजन समाजावर अन्याय असुन बहुजन विरोधी विचारधारेच्या खा.अनुराग ठाकुर यांच्या वक्तव्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक्सवर ट्विट करून केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे जे की निंदनीय आहे. देशाचे लोकप्रतिनीधी हे देशातील नागरीकांचे सेवक असुन मालक नाहीत.
त्यामुळे लोकप्रतिनिधींनी धर्मनिरपेक्षता पाळणे अपेक्षित असतांना खा.अनुराग ठाकुर यांनी राहुल गांधीवर वैयक्तिक टिका करत अपमान केल्याने काँग्रेस नेत्या डाॅ. शिलु चिमुरकर यांच्या नेतृत्वात देसाईगंज तालुका काँग्रेसच्या वतिने खा.अनुराग ठाकुर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करून जाहिर निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,महिला तालुका काँग्रेस अध्यक्षा पुष्पा कोहपरे,जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र गजपुरे, युवा नेते पिंकु बावणे, लिलाधर भर्रे, जगदिश शेंद्रे, महेंद्र खरकाटे, भुमेश्वर शिंगाडे, महादेव कुंमरे, गीता नाकाडे, वैष्णवी आकरे, विमल मेश्राम, शहनाज पठाण आदी देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.