ब्रेकिंग न्युज… — खोब्रागडी नदीमध्ये वाहून आला अनोळखी मृतदेह…

अश्विन बोदेले 

जिल्हा प्रतिनिधी 

 दखल न्यूज भारत 

वैरागड :- आरमोरी तालुक्याच्या वैरागड जवळच्या खोब्रागडी नदीपात्रातील एका झाडाच्या बुडाला अनोळखी अंदाजे 45 वर्षे वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळला.

       पुराच्या पाण्यात मृतदेह वाहून आल्याचा संशय आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. वैरागड येथील शेतकरी आपल्या शेत परिसरात शेतीची कामे करीत असताना नदीपात्रात काही कामानिमित्त गेले असता, त्यांना खोब्रागडी नदीपात्रातील एका झाडावर मृत अवस्थेत अनोळखी इसमाचे शव अडकलेले दिसून आले.

             वेळीच या घटनेची माहिती आरमोरी पोलीस स्टेशनला देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळ गाठून शव गावकऱ्यांच्या मदतीने झाडावरून नदी काठावर काढले.

             विशेष म्हणजे मृत व्यक्तीच्या अंगावर कुठलेही कपडे नव्हते. बहुतांश अवयव सडलेले स्थितीत दिसून आले. पोलिसांनी या इसमा बाबत विचारणी केली असता गावकऱ्यांनी या इसमाला ओळखत नसल्याचे सांगितले.

           त्यामुळे सदर इसम वाहून आले असावे असा अंदाज आहे. आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.