तालुका कृषी विभागा तर्फे अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंर्तगत जिल्हा कृषी अधीक्षक, एसडीओ यांनी प्रगतिशिल शेतकरी वांढरेच्या शेतात ‘श्री’ पद्धतीने धान लागवड केली.. 

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

पारशिवनी :- आज दिनांक 31/07/2024 बुधवार रोजी पारशिवनी तालुकातील मौजा- साटक येथे पारशिवनी तालुका कृषी विभागा तर्फे अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंर्तगत जिल्हा कृषी अधीक्षक श्री. रविन्द मनोहरे साहेब यांनी प्रगतिशिल शेतकरी श्री.गजानन बापूरावजी वांढरे यांच्या शेतात ‘श्री’ पद्धतीने धान लागवड केली.

             तसेच संबंधित शेतकऱ्यांना ‘श्री’पद्धतीचे फायदे सांगून उपस्थित सर्व शेतकऱ्यांसोबत प्रधानमंत्री पिक विमा योजना, पी.एम.किसान योजना व पिक पाहणी इत्यादी बद्दल चर्चा करून पीक परिस्थिती बाबतीत माहिती घेतली व पीक परिस्थिती नुसार मार्गदर्शन केले. 

       यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक श्री.रविंद्र मनोहरे साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी श्री.सोमनाथ साठे साहेब, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते मॅडम, तालुका कृषी अधिकारी श्री. राजकमल डहाट साहेब, मंडळ कृषी अधिकारी श्री. प्रभाकर शिरपूरकर साहेब, कृषी अधिकारी (पं.स.) श्री. चन्द्रकांत देशमुख साहेब, विस्तार अधिकारी श्री.बाळापुरे साहेब , साटक ची तलाठी प्रियंका गुबे, ग्राम पंचायत साटक चे ग्रामसेवक लांजेवार तसेच कृषी सहाय्यक श्री.के.बी.ठोंबरे, कु.एस.टी.राठोड, नवनियुक्त कृषी सेवक श्री. बोरसे,कु.गायकवाड , कु.कांबळे,ग्रामपंचायत साटक चे सरपंच तरुण कुमार बर्वे, उपसरपंच रविन्द गुडधे,ग्राम पंचायत सदस्य आशिष देशमुख विलास बेनिबागदे , मालतीताई तांडेकर,लालिताताई दुधपाचारे ,ललिताताई चामट,मीनाक्षीताई भुते,प्रगतशील शेतकरी श्री बापुरावजी वांढरे तसेच इतर शेतकरी, गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.