रामगाव येथिल सरपंचाचा ‘मेरी माती मेरा देश’ योजनेतील वृक्षारोपणात गैरप्रकार, वरिष्ठांकडून तक्रारीला केराची टोपली…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

             खल्लार नजिकच्या रामगाव येथील सरपंचाने शासनाच्या फसवणूक केली असल्याची तक्रार उपसरपंच, ग्रा पं सदस्य यांनी वरिष्ठांकडे केली आहे.

              रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या मेरी माती मेरा देश या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत मार्फत रामगाव येथील ई क्लास गायरान पडीत जमिनीवर सन 2023 मध्ये 800 झाडाची लागवड करण्यात आली होती.

           मात्र तेथील ग्रामपंचायत सरपंचांच्या मनमानी कारभारामुळे त्या झाडाची योग्यरित्या काळजी घेण्यात आली नसल्याने 150 झाडे जिवंत असल्याचे रामगाव येथील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तथा गावकऱ्याचे म्हणणे आहे.तसे निवेदनात पुराव्यासहित रीतसर तक्रार सुद्धा वरिष्ठाकडे केली आहे मात्र त्या तक्रारीची वरिष्ठांनी दखल घेतली नाही.

            झाडावर देखरेख करण्याकरिता त्यांना पाणी खुरपणी आदिकरिता रोजगार हमी योजनेअंतर्गत त्या गावातीलच चार व्यक्तीची मजूर म्हणून नियुक्ती केली आहे. परंतु ग्रामपंचायत सरपंच सौ.छाया संजय घरडे यांनी घरातील पती संजय घरडे यांची आई वडील मुलगा , मुलगी संजय घरडे हे कामावर नसतानाही त्यांच्या नावे रजिस्टर वर हजेरी लावून त्यांच्या नावे शासनाने ठरवून दिलेल्या रोजंदारी प्रमाणे 2021 ते 2024 पर्यंत रोजंदारीचे मस्टर भरून पैसे काढण्यात आले.

           तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील वृक्ष लागवड व इतर कामाची सर्वस्वी जबाबदारी पार पाडण्याचा रोजगार सेवक गजानन गुगल मॉल यांच्यावर खोटे नाटे आरोप करून त्यांच्यावर दबाव टाकून कामावर नसलेल्या सरपंचाच्या घरच्या लोकांची हजेरी भरून त्यांचे नावे सुद्धा पैसे हडपण्याचे प्रकार घडत आहे.

         सदरहू ग्रामपंचायत सरपंचांनी आपल्या सरपंच पदाचा गैरवापर करून सदर व प्रकार स्वतःच्या मर्जीने करीत आहेत सन 2021 ते 2024 या वर्षात 11,193 रुपये व 8736 असा एकूण 19929रुपयाची अफरातफर केली आहे.

          स्वतःच्या मर्जीने हा भ्रष्टाचार केला आहे याबाबत पूर्वी प्रशासनाला लेखी स्वरुपात तक्रार करण्यात आली. तरीही स्वतःच्या मनमानी कारभाराने स्वतःच्या आई, वडील, मुलगा, मुलगी या नावाने रोजगार हमीचे मस्टर काढून शासनाची दिशाभूल करून 19929 रुपयाचा अपहार केला आहे.

         तरी या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करून सरपंच व पदाधिकाऱ्यांना व सचिवांना ग्रामपंचायतचे सचिव हे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. सचिवाच्या सही शिवाय मस्टर निघू शकत नाहीत. याला सचिव सुद्धा जबाबदार आहे तरी सरपंच व सचिवाला करण्यात यावे. अशी मागणी रामगाव येथील तेजस्विनी अनिल घरडे तथा ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामस्थ तथा गावकऱ्यांनी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया

         पंचायत समितीकडे तक्रार दाखल होताच तक्रारीची योग्य ती चौकशी करुन भ्रष्ट सरपंच व ग्रा पं सचिव यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. 

  सि.जे.ढवक

गटविकास अधिकारी