ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
लाखनी : देवशयनी आषाढी एकादशी निमित्त दिनांक 30 जुलै ते 9 ऑगस्ट पर्यंत सकाळी दहा वाजता स्वागत लाॅन सभागृह लाखनी येथे तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राला संत परंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे वारकरी संप्रदायाने आपल्या आध्यात्मिक परंपरेतून समानतेचा एकात्मतेचा जो संदेश सर्व जगाला दिला आहे तो सर्वांपर्यंत पोहोचविण्याची एक प्रभावी माध्यम म्हणजे भजन आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात युवा पिढीला अध्यात्माची आवड जोपासता यावी भजन गायकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे.
यासाठी वैणगंगा बहुउद्देशीय शिक्षण संस्थांचे अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर यांच्या संकल्पनेतून तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
ही भजन स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येत असून 30 जुलै ते 9 ऑगस्ट या दरम्यान आयोजित केली आहे.
सर्व इच्छुक नागरिकांना भजन गायक भजनी मंडळांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन डॉ. सोमदत्त करंजेकर यांनी केले आहे.