
रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
कन्हान :- माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने नागपुर जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष याचे प्रमुख उपस्थितीत कन्हान शहरातील राधाकृष्ण नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नागपूर शिवसेना महीला(ग्रामीण) जिल्हा प्रमुख सौ.दुर्गाताई कोचे याचे उपस्थितीत तसेच वृक्षरोपण करण्यात आले.
या प्रसंगी कन्हान येथील शारदा शेंडे,सीमा रवि कोचे,रोशनी पुणेकर,मीनाक्षी कशब व कुंदा बागडे सह महिला सेनाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होत्या.