डॉ. सतिशभाऊ वारजूकरांकडून घर पडलेल्यांना आर्थिक मदत…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

           मागील चार दिवसापासून सतत पाऊस येत असल्याने बऱ्याच लोकांचे घर पडले असून शेत पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाचे चिमूर विधानसभा समन्वयक डॉ.सतीश वारजुकर यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे.

         चिमूर विधानसभेत मागील चार दिवसापासून अतिवृष्टी सुरू आहे बऱ्याच लोकांचे घरे पडली आहेत. त्यामुळे यांनी आज नागभीड तालुक्यातील नांदेड, चिखलगांव, किटाळी, चिंधीचक, जनकापूर, येथे प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित केलेला आहे. प्रत्येक खेडोपाडी जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे.

             तसेच गावात लोकांशी संवाद साधून ज्यांचे घर पडले त्याही घरांची त्यांनी पाहणी केलेली आहे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पूरग्रस्त पाहणी करून त्यांनी संबंधित विभागाला पंचनामा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सोबतच स्वतःकडून त्यांना आर्थिक मदत दिलेली आहे.

             त्यात नागभीड तालुक्यातील मांगरूड येथील वनिता निकुरे,हिरालाल सहारे, सूर्यभान किन्नाके,राजू कावळे यांचे घर पडलेले आहेत त्या घरांची पाहणी करून त्यांनी स्वखर्चातून आर्थिक निधी दिलेला आहे. सोबतच संबंधित विभागाला पंचनामा करून शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन या अपतग्रस्तांना देण्यात आलेले आहे.

            त्यांचा हा पाहणी दौऱ्यात प्रामुख्याने चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव खोजरामजी मरसकोल्हे,लोकसभा निरीक्षक जेष्ठ नेते विनोद बोरकर, नागभीड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पुरुषोत्तम बगमारे,सेवादल काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ. रवींद्र कावळे, नागभीड तालुका काँग्रेस कमिटी सचिव शरद सोनवाने, ग्रामपंचायत सरपंच येनोली अमोल बावनकर, ग्रामपंचायत सरपंच मिंडाळा गणेश गड्डमवार,तालुका उपाध्यक्ष हरीश मुळे,युवक काँग्रेस महासचिव अमोल बावनकर,नागभीड तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष तरबेज शेख,तळोधी शहर अध्यक्ष वसीम सुकारिया,विधानसभा उपाध्यक्ष युवक काँग्रेस संकेत वारजुकर, समन्व्यक नागभीड नगर परिषद गणेश फुंडे,शहर उपाध्यक्ष प्रशांत गेडाम, विधानसभा उपाध्यक्ष विजय अमृतकर,सरपंच चिखलगांव,दिनेश सुखदेवे, दिलीपजी पडोळे नितेश उईके,मुन्ना राऊत, नेहाला शेख, चेतन माथणकर,सौरभ मदनकर उपस्थित होते.