
रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
नागभीड तालुक्यातील मांगरुड येथील शेतकरी शेतात गेला असता तेथे त्याला विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त, मागील पाच ते सात दिवसांपुर्वी परिसरात पाऊस पडल्यामुमुळे शेतात शेत पीक पाण्याखाली आले असता शेती पाहण्यासाठी गेला. पुरुषोत्तम मसराम यांना शेतातच सर्प दंश झाला व त्यांचा मृत्यू झाला.
आज राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा हे नागभीड तालुका दौऱ्यावर असतांना मांगरुड येथे गेले असता त्यांच्या परिवाराची भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली.
यावेळी प्रामुख्याने चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव खोजरामजी मरसकोल्हे,लोकसभा निरीक्षक जेष्ठ नेते विनोद बोरकर, नागभीड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पुरुषोत्तम बगमारे,सेवादल काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ. रवींद्र कावळे, नागभीड तालुका काँग्रेस कमिटी सचिव शरद सोनवाने, ग्रामपंचायत सरपंच येनोली अमोल बावनकर, ग्रामपंचायत सरपंच मिंडाळा गणेश गड्डमवार,तालुका उपाध्यक्ष हरीश मुळे,युवक काँग्रेस महासचिव अमोल बावनकर,नागभीड तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष तरबेज शेख,तळोधी शहर अध्यक्ष वसीम सुकारिया,विधानसभा उपाध्यक्ष युवक काँग्रेस संकेत वारजुकर, समन्व्यक नागभीड नगर परिषद गणेश फुंडे,मागरुड ग्रामपंचायत उपसरपंच वैभव निकुरे,शहर उपाध्यक्ष प्रशांत गेडाम, विधानसभा उपाध्यक्ष विजय अमृतकर,सरपंच चिखलगांव,मुन्ना राऊत, नेहाला शेख, चेतन माथणकर,सौरभ मदनकर उपस्थित होते.