लोकन्यायालयात 15 आरोपींना गुन्ह्याची शिक्षा..

युवराज डोंगरे

उपसंपादक
दिनांक 27 जुलै रोजी दर्यापूर येथे लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
या लोक-न्यायालयात खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील खल्लार टाऊन,कसबेगव्हान,कोकर्डा,उपराई या चार बिटमधिल ज्या गावात व ज्या आरोपींवर खल्लार पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमाखाली गुन्हे दाखल होते, त्या आरोपींनी या लोकन्यायालयात स्वतः गुन्ह्याची कबुली दिली.
         गुन्ह्याची कबुली दिलेल्या 15 आरोपींना लोकन्यायालयाने रोख रकमेचा दंड व शिक्षा सुनावली आहे.
ज्या 15 आरोपींना लोकन्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.त्यात 283 चा एक आरोपी, 85 (1)(2)चे दोन आरोपी,185 चे दोन आरोपी व 12 (अ)चे 10 आरोपी असे एकुण 15 आरोपींना लोकन्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.