प्रितम जनबंधु
संपादक
धानोरा तालुक्यातील निमगाव ते रांगी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असुन रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, तर पावसामुळे रस्ता खड्डेमय व चिखलमय झाला असल्याचे अनपेक्षित चित्र बघायला मीडत आहे. शिवाय “रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता” असा अनुत्तरीत उपेक्षित सवाल निमगाव वासीयाच्या मनाचे ठाव घेत आहे.
सदर रस्त्याने छोट्या-मोठ्या वाहनचालकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याचा मानसीक त्रास नागरीकानाच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागतो आहे. पण प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करीत असल्याचे नागरिकांकडुन बोलल्या जात आहे.
रांगी ते निमगाव रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात छोटी-मोठी वाहने ये-जा करत असतात. शालेय विद्यार्थ्यांनाही याच रस्त्याचा वापर करावा लागत आहे. या रस्त्यावरून सातत्याने वाहनांची वर्दळ असते; मात्र गेल्या काही वर्षापासून निमगाव ते रांगी पर्यंत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण पुर्णतः उखडले असुन रस्त्याची दुरावस्था झाल्याचे बघायला मीळत आहे.
शिवाय गेल्या चार पाच दिवसापासुन सुरु असलेल्या संततधार पावसाने मात्र या रस्त्यावर भला मोठा भगदाड पडला असुन वाहतुकीची पुर्णतः कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहनचालक चांगलेच त्रस्त झाले आहेत.
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गावकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहेत. गामपंचायत तथा गावकरी यांचेकडून रस्ता दुरुस्त करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे तरी पण संबंधित विभाग मात्र दुर्लक्ष करीत असुन निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून, रस्ता खड्डेमय तद्वतच चिखलमय झाला आहे.
सदर रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चालणं झालीय. यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करून वाहन चालवावे लागत आहेत. वळण रस्ता ठिकाणी झालेले भल्या मोठ्या खड्यातुन वाहन चालतांना डान्स करावा लागतो आहे. तसेच रस्त्यावर पादचारी, वाहनांची रोजच वर्दळ असते. ठिकठिकाणी पडलेले खड्डे वाहतुकीस घातक ठरु पहात आहेत. खड्ड्यात पाणी थांबल्याने दुचाकी वाहनांचे किरकोळ अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.
वरील सर्व बाबीचा सारासार विचार करून संबंधित विभागाने तातडीन रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आणी पक्का रस्ता करुन पुर्णतः खडीकरण व डांबरीकरण करून रस्ता प्रवासास सोयीस्कर करुन द्यावा अशी रास्त मागणी निमगाव वासीय तथा परीसरातील नागरिकांनी केली आहे.