माहुली येथे वाघाच्या हल्ल्यात गाय ठार….   

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

पारशिवनी :- माहुली गाव लगतच गावापासून ५०० मिटर अंतरावर पशुमालक निखिल विठ्ठल चौधरी रा माहुली याची दुधारू जर्शी गाय चरत असताना आज शनिवार दुपारी २.०० वाजता च्या दरम्यान वाघाने मागुन पंजा मारून जर्शी गाईला भर दुपारी मारली.

           या क्षेत्रात मागिल दोन दिवसा पासुन वाघ फिरत असल्याची गावात दिसत होता. शुक्रवारी रात्रि  ८.०० वाजता वाघ  भुलेवाडी शेत शिवार येथिल प्रमोद निबुरकर व रवि दिवटे यांचे शेतात फिरत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली पारशिवनी वनपरिक्षेत्र हद्दीतील खैरीनवेगाव , माहुली,बच्छेरा चारगाव बिटोली आवडेघाट तामसवाडी भागीमहारी सह जवळपास पासच्या गावात व शेतात वाघाची दहशत असल्याने शेतकरी व मजुर शेतात जात नाही.

               शनिवार दुपारी माहुली गाव लगतच २२७ जुलै ला दुपारी २.०० वाजता च्या दरम्यान घडली. पशुमालक निखिल विठ्ठल चौधरी राहणार माहुली तालुका पारशिवनी असे पशुपालकाचे नाव असून त्यांच्याकडे दुधारू जर्शी  गायी, आहेत.

           शनिवारी दुपारी गाय गावापासून ५०० मिटर अंतरावर चरत असताना वाघाने दुधारू जर्शी गायीवर प मागुन पंजा मारून जर्शी गाय मारली.

           पशुमालक निखिल चौधरी यानी  वनविभागाचे वनरक्षक डि जी विभुते यांना माहिती दिली  घटना स्थळी वनरक्षक डि जी विभुते यांनी आपले वरिष्ठ अधिकारी यांना माहिती दिली व मृत गायीचा पंचनामा केला व पशुमालक व गावातील शेतकरी व नागरिकानी दुधारू जर्शी गायीचे  नुकसान भरपाई द्यावी, वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली.