नीरा नरसिंहपूर दिनांक:9
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
श्री लक्ष्मी नृसिंह जयंतीच्या निमित्ताने भीमशक्ती सामाजिक संघटना तालुका अध्यक्ष युवराजमामा पोळ यांनी नीरा नरसिंहपूर येथील पुरातन काळातील प्रसिद्ध देवस्थान श्री लक्ष्मी नृसिंह चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.
निरा व भिमा या नदीच्या संगमावर वसलेले हे मंदिर अतिशय पुरातन आसुन विविध पुराना मध्ये या मंदिराचे वेगवेगळे दाखले आपणांस पहावयास मिळतात.लक्ष्मी नृसिंह देवस्थानचे महात्म्य इंदापूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्राभर प्रसिद्धी आहे.त्यामुळे एक प्रसिद्ध तिर्थक्षेत्र म्हणून या देवस्थानची ओळख आसल्याने दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी नतमस्तक होत असतात.
भीमशक्ती सामाजिक संघटना तालुका अध्यक्ष युवराजमामा पोळ हे दरवर्षी लक्ष्मी नरसिंहाच्या दर्शनासाठी येत आसतात. ते पुढे बोलत आसताना म्हणाले की. सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून पुरातन काळातील लक्ष्मी नरसिंह देवस्थानची श्रद्धा आणि आशीर्वाद पाठीशी आसल्यामुळे आनंदाने आम्ही दर्शनासाठी येतो.तसेच माझ्या गरीब कुटुंबातील कष्टकरी मजूर शेतकरी राजा यांना सुखाचे जीवन मिळू दे युवराजमामा पोळ यांचे यावेळी उद्गार.
युवराजमामा पोळ यांनी लक्ष्मी नृसिंहाची विविधत पुजा करून दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी सध्या ना उमेद झाला आहे.
त्यामुळे यंदा पाऊस-पाणी चांगला पडून माझ्या बळीराजाचे शेत-शिवार पुन्हा एकदा भरभरून पिकु दे तसेच शेतमालाला चांगला भाव मिळून शेतकरी बांधवांच्या जिवनात समृद्धी येऊ दे अशा प्रकारचे साकडे तालुका अध्यक्ष युवराज मामा पोळ यांनी श्री लक्ष्मी नृसिंह चरणी घातले.
यावेळी देवस्थानच्या वतीने युवराज मामा पोळ यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी देवस्थानचे अध्यक्ष तसेच सर्व ट्रस्ट, यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व ग्रामस्थ, भैय्यासाहेब पोळ, नितीन सरवदे, नबिलाल शेख,देवा सरवदे,नाना गायकवाड, तानाजी कदम, सुधीर चव्हाण, आरुण कांबळे, बबन ठोकळे, डॉक्टर सिद्धार्थ सरवदे, सतीश जगताप, यश पोळ, बिबीशन कोळी, यांच्यासह आनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.