वयोवृृृृद्ध कलावंतांना पेन्शनसाठी कलावंतांचे संगीतमय आंदोलन उद्या…  — प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचा पुढाकार…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली : प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीने वयोवृद्ध कलावंतांना नियमित पेन्शन मिळावी यासाठी भंडारा जिल्ह्यातील ‘कलावंताचे संगितमय आंदोलन दि. २९ जुलै २०२४ रोजी स.११ वाजता भंडारा येथील  त्रिमुर्ती चौकात कला व  सामाजिक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम यांच्या नेतृृृृृत्वात आयोजित केले आहे.

       सन २०२१ पासून वृद्ध पेन्शन धारकांची फाईल काढून मानधनासाठी निवड करणे, कलावंत मानधन निवड समिती तात्काळ तयार करावी, निवड समितीमध्ये राजकारण नको, जे खरे कलावंत आहेत त्यानांच त्या समितीवर ठेवणे, वृद्ध कलावंतांची वय मर्यादा ४५ वर्षे असावी, पेन्शन मिळवून देण्यासाठी कलावंताकडून होणारी लूट थांबवावी, कलावंताना विमा लागू करण्यात यावा, शासकीय व निम शासकीय दवाखाण्यात कलावंताना विशेष सुट देण्यात यावी,  कलावंत कार्यक्रमाला जात असतांना टोल माफ करण्यात यावे.

         निवड करतांना कलावंताची कला सादर करायला लावून तो योग्य असेल तरच त्यांची निवड करावी, काही बोगस कलावंताना मानधन मिळत आहे. त्याची चौकशी करण्यात यावी व तो योग्य कलावंत नसल्यास त्याची पेन्शन बंद करण्यात यावी या व इतर मागण्यांचा या आंदोलनात समावेश आहे.

         आंदोलन हे अण्णाभाऊ साठेचौक(कुकडे दवाखाना) येथून निघून त्रिमूर्ती चौक येथे सभेत रूपांतर होईल.

    जिल्ह्यातील कलावंतांनी जास्तीत संख्येने या संगीतमय आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडाराच्या वतीने जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले,राकेश वालदे ,मनोज कोटांगले, सुशील खांडेकर,सुरेंद्र उके, गणेश आथिलकर, धनंजय धकाते, उमेश भोयर, यशवन्त बागडे,सोनू मेश्राम, संजय टेम्भुरने, ईश्वर धकाते, स्वप्नील बन्सोड, रवी ठवकर, प्रविण भोंदे, सोमप्रभु तांदुळकर, महेंद्र गोंडाने, लक्ष्मीकांत मेश्राम,अक्षय मेश्राम, कार्तिक मेश्राम व अन्य पदाधिकार्‍यांनी केले आहे.