समरगीत स्पर्धा नागपूर येथे आयोजित साकोली संघाचा प्रथम क्रमांक…  — 9 आगस्ट 2024 क्रांती दिनी सोलापूर येथे राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय १ ,चंदननगर नागपुर येथे आयोजित गटस्तरीय समरगीत/ स्फूर्तीगीत स्पर्धा दि.२६ जुलै २०२४ आयोजित करण्यात आली होती.

            त्यामध्ये केंद्र संचालक सतीश कुटे यांच्या नेतृत्वात प्रबोधनकार कला साहित्य संघ जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले व संच यांनी कामगार कल्याण केंद्र साकोली संघाचे नेतृत्व करून नागपूर विभागातून प्रथम क्रमांक मिळविला.

           राज्यस्तरीय स्पर्धा ही 9 आगस्ट 2024 ला क्रांती दिनानिमित्त सोलापूर येथे आयोजित करण्यात आली. त्यामध्ये साकोली संघ नागपूर विभागाचे नेतृत्व करणार आहे. मागच्या वर्षी सुद्धा याच संघाने नागपूर विभागातून प्रथम क्रमांक मिळवून नाशिक येथे राज्यस्तरीय स्पर्धेचे नेतृत्व केले होते.

           या बद्दल सर्व जिल्ह्यातील प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे पदाधिकारी कलावन्त, तथा सर्व आदरणीय मान्यवर मित्र मंडळी यांनी शुभेच्छा दिल्या.

           त्यामध्ये संघात जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले, प्रज्ञाशील मेश्राम, पितांबर सूर्यवंशी, अमर दिघोरे, लक्ष्मीकांत बोरकर,संदीप कोटांगले ,खुशाल इठोले, अभिषेक रामटेके, प्रल्हाद भुजाडे, अर्चना कान्हेकर, प्रतिभा साखरे, करिष्मा भाग्यवंत, हे कलावंत कामगार कल्याण केंद्र साकोली च्या वतीने सहभागी झाले होते.