कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
पारशिवनी:-दिनांक 24 जुलै 2024 रोजी कन्हान ॲग्रो व्हिजन शेतकरी उत्पादक कंपनी निलज ( पारशिवनी) येथे केंद्रीय कृषी विभाग पथकाची भेट यावेळी कार्यक्रम स्थळी भेट दिली.
यावेळी विविध केंद्रीय अधिकारी तथा महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे सहसंचालक तथा कृषी अधिकारी उपस्थित होते. तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया नागपूरचे संचालक व त्यांच्या चमुने विशेष उपस्थिती दर्शविली.
यावेळी नीलज येथील ग्रामपंचायत सरपंच सह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कन्हान ॲग्रो व्हिजन शेतकरी उत्पादक कंपनीतील सभासद शेतकरी व आजूबाजूच्या गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रम स्थळी उपस्थित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या स्वागत कार्यक्रमा नंतर श्री.कमलेशजी भोयर(अध्यक्ष) यांनी कंपनीचे कार्य व भविष्यातील योजना याबद्दल माहिती दिली.
यावेळी केंद्रीय पथकाचे संचालक श्री.परिमल सिंग यांनी कंपनीचे अध्यक्ष कमलेशजी भोयर यांच्याशी या विभागातील मुख्य पीक धान,गहू, चना सोयाबीन इत्यादी पिकाबाबत उत्पादन वाढीच्या अनुषंगाने चर्चा केली.
तसेच विभागीय कृषी सहसंचालक श्री.शंकरजी तोटावार यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती बाबत माहिती दिली.तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.रवींद्रजी मनोहरे यांनी शेतकऱ्यांना भात शेती मध्ये यांत्रिकीकरण पद्धतीने शेती करण्यास व शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापराबाबत माहिती दिली.
श्रीमती प्रज्ञा गुळघाटे विभागीय नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प नागपूर,यांनी स्मार्ट प्रकल्पाच्या अनुषंगाने राईस मिल प्रक्रिया युनिटच्या माध्यमातून ग्रामीण परिवर्तन करू शकतो याबाबत मार्गदर्शन केले.
जास्तीत जास्त महिलांना उत्पादक कंपनी मध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले.श्रीमती अर्चना कडू संचालक आत्मा प्रकल्प नागपूर,कार्यकमाची रूपरेषा व उदिष्ट याबाबत माहिती दिली.
श्री.अरविंदजी उपरीकर नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प कार्यालय नागपूर यांनी शेतकरी बांधवांना गटस्थापने बाबत मार्गदर्शन केले.
श्री.उपविभागीय कृषी अधिकारी रामटेक,श्री.साठे यांनी शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या योजना योजनेच्या अंमलबजावणी बाबत अवगत केले.
श्री.तालुका कृषी अधिकारी राजकमल दहाट यांनी शेतकरी बांधवांना पिक विमाचा लाभ घेण्यासंदर्भात आवाहन केले. शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांचे मान्यवरांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व फळांचे झाडे देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी आरबीआय नागपूरचे संचालक श्रीमती अंजना श्यामनाथ यांनी सायबर क्राईम याविषयी शेतकरी बांधवास आवर्जून ऑनलाइन फ्रॉड कसे होतात याबाबत मार्गदर्शन केले.
रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि स्मार्ट प्रकल्प टीमच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सोबतच वित्तीय व्यवस्थापन आणि वित्तीय सुरक्षा,सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे अंजना श्यामनाथ DGM,श्री.पियूष तेलरांधे AGM, शशांक हर्देनिया AGM, लाभले होते.
यावेळी बहुसंख्य शेतकरी बांधवांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कंपनीतील संचालक मंडळ व शेतकरी बांधव श्रीअभिजीत फरसोले,राजेंद्रजी बंड,संदीप कडू,मंगला भोयर,कविता बंड,सोनाली फरसोले,सरपंच सुनील डोंगरे,उपसरपंच गुंडेराव भुते,कोठीराम चकोले,सचिन चकोले,राकेश चकोले,राकेश पोटभरे,प्रफुल नागपुरे,राजेश चकोले,मनोज टोहने,निखिल कारेमोरे,वंश चकोले,रोमन पाहुणे,धनराज चकोले इत्यादी शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी श्री.विवेकानंद शिंदे यांनी केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व आभार प्रदर्शन श्रीमती अर्चना कडू संचालक आत्मा प्रकल्प नागपूर यांनी केले.