युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
खल्लार फाटा ते चंद्रपूर या 1 या कि.मी दुर्दशा झाली असून रोडला जागोजागी खड्डे पडलेले आहेत. यामुळे रहदारी करतांना नागरिक व विद्यार्थी वर्ग खूपच त्रास सहन करावा लागत आहे.
जेमतेम पावसाळ्याला आता सुरुवात झाली आहे.या रस्त्याच्या दोन्ही बाजूने पावसामुळे मोठ मोठया चरा पडल्या आहेत. त्यामुळे साधी दुचाकी चालविणे कठीण झाले आहे. या रस्त्याने जाण्या येण्याची खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांची, विद्यार्थ्यांची वर्दळ सुरु राहते मात्र या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या वर्दळीच्या रस्त्याकडे लक्ष देऊन हा रस्ता चांगला करावा याबाबतचे निवेदन खासदार बळवंत वानखडे यांना देण्यात आले आहे.हा रस्ता लवकर चांगला करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.