प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
नियमानुसार झाडांची कटाई करण्याला स्थानिक महशुल व वन विभाग परवानगी देतय.पण बेकायदेशीर वृक्ष कटाईला तेच संबंधित प्रशासन कसी काय परवानगी देतय हेच कळायला मार्ग नाही.
तसेही वृक्ष कटाई करताना शेतकऱ्यांच्या नावाने वृक्ष कटाईंची परवानगी दिली जातय.यामुळे वृक्ष तोड करणारे ठेकेदार हे वेळप्रसंगी हात वर करतात आणि मी तो नव्हेच असी भुमिका घेतात.
इतर किसमच्या व सागवान वृक्षांची तोड करण्याच्या परवानगी अंतर्गत सर्व जबाबदारी व्यवसायीक घेतात.वृक्ष व्यवसायीकांचे थेट संबंध संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसी व सदर कर्मचाऱ्यांसी असतात.यामुळे कायदेशीर व बेकायदेशीर वृक्षतोडीचे सर्व पाणी पध्दतशीरपणे मुरवीले जात असते..
चिमूर ते वरोरा महामार्गाला लागूनच सोनेगाव जवळ सर्वे नंबर १७५/२ शेत आहे.तद्वतच हे शेत अगदी नदीला लागून आहे.या शेतजमिनी अंतर्गत सागवान वृक्ष तोडण्यासाठी चिमूरच्या संबंधित कार्यालयाकडून परवानगी दिली गेली होती.
मात्र सदर शेतातंर्गत वृक्ष तोड करताना सर्व नियमांची पायमल्ली करण्यात आली आणि अगदी नदी थडव्यावरील सागवान वृक्षे तोडण्यात आली.
ज्यांच्या शेतातील सागवान वृक्ष तोडण्यात आली तो शेतकरी चिमूरचा रहिवासी असून वृक्ष तोड करणारा व्यवसायीक व्यक्ती हा उमरेड येथील रहिवासी आहे.
बेकायदेशीर वृक्ष तोड झाली या बाबत चिमूर वनपरिक्षेत्राधिकारी किशोर देऊळकर यांच्या सोबत भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला असता त्यांनी वाळलेली झाडे तोडायला काय हरकत?असे बेसावधपणे उत्तर दिले.
मात्र,तोडलेली ती सागवान वृक्ष वाळलेली नसून ओली सागवान वृक्ष होती असे प्रत्यक्षदर्शी पाहणी वरुन लक्षात येते आहे.
अधिकारीच वृक्ष संवर्धना संबधाने बेसावधपणे कर्तव्य पार पाडत असतील तर वृक्ष संवर्धन होणार तरी कसे?