पारशीवनी तालुक्यात दमदार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान.. — तहसिलदार याना दिले निवदेन..

      कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:-पारशीवनी तालुक्यात मागील 19 ते 21 जुलाई च्या दरम्यान तिन चार दिवसांपासून सतत होणाऱ्या दमदार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष एड.सुरेश माने व विदर्भ प्रदेश अध्यक्ष विशेष फुटाणे यांच्या मार्गदर्शनात व रामटेक विधानसभा प्रमुख शांताराम जळते यांच्या नेतृत्वात पारशीवनीचे तहसिलदार राजेश भांडारकर यांना 22 जुलैला निवेदन देण्यात आले.

         निवेदनात सांगितले की,तालुक्यातील सर्वत्र भागात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले असून धान,कापुस,तूर,सोयाबीन सह अन्य पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. 

        तसेच टेकाडी कोयला खदान च्या पेंढारवाही नाल्याच्या पाण्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे व शेतातील पीक सडत आहे.

           यावर तहसिलदार राजेश भांडारकर यांनी तातडीने सबंधित विभागाला निर्देश देऊन तसेच वेकोलीचे अधिकाऱ्यांना नुकसानीची महिती देऊन पाहणी करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहे. 

         याप्रसंगी निवेदन देतांना पिढीत शेतकरी भगवानदास यादव,रामू गुरधे,उमेश गुरधे सह असंख्य शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.