कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
कन्हान : – गटग्राम पंचायत घाटरोहना एसंबा क्षेत्रात गुप्ता कोल वॉशरी (महामीनरल) च्या कोळसा व केमि कल युक्त दुषित पाणी व धुळीच्या प्रदुषणामुळे परिसरातील शेतकरी,मजुर,युवा रोजगार त्रस्त असुन शेतक-यांचे शेत पिकाचे व शेतीचे नुकसान होत आहे.
कोल माईसच्या प्रदुषणामुळे ग्रामस्थाच्या आरोग्यावर दुष्परिणामाने नागरिक त्रस्त असल्याच्या तक्रारी ग्राम पंचायतीला प्राप्त झाल्याने,ग्रामपंचायतव्दारे कंपनी प्रशासनाला पत्र दिल्यानंतर सुध्दा दखल न घेतल्यास व कपंनीने व्यवस्थित कंपनी चालवुन मागणी पुर्ण न केल्यास कंपनी गेट पुढे स्थानिक नागरिकांचे अर्ध नग्न आंदोलन करण्याचा इशारा सरपंच किशोर बेहुणे यांनी दिला आहे.
मागील अनेक महिन्यांपासुन क्षेत्रातील नागरीकांच्या अनेक तक्रारी गुप्ता कोल वॉशरी (महामीनरल ) विरोधात ग्राम पंचायतीला प्राप्त झालेल्या आहेत.त्या विषयी पत्र दि.२६ जून ला गुप्ता कोल वॉसरीला देण्यात आले होते.
यावर प्राप्त उत्तराने ग्रा.प.संतुष्ट नसल्याने पुन्हा एकदा निवेदनासह विषय १) गुप्ता कोल वॉशरी (महामीनरल) कंपनीमध्ये कार्यरत कर्मचा-याना या आधी एका ठेकेदारा कडुन नियुक्त पत्र मिळालेलं होत. त्यांचे कडुन रीतसर वर्षभर पगार प्राप्त झाला.मात्र गेल्या काही महिन्यांपासुन कंपनी आणि कर्मचारी यांच्यात एक ब्रोकर (दलाल) मध्यस्ती करित स्वतःची टक्केवारी कापुन कर्म चाऱ्यांना पगार देतो.
यावर अद्याप कुठलिही दखल न घेता उलट कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक आणि मानसिक शोषनात कंपनी ब्रोकर (दलाला़) ला सहकार्य करित आहे.
२) सन २०२२-२३ वर्षी वराडा व येसंबा गावातील वॉशरीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली होती.परंतु सन २०२३-२४ यावर्षी नुकसान भरपाई अद्याप ही पीडित शेतकऱ्यांना देण्यात आली नाही.
कंपनी मधुन निघणाऱ्या केमिकल युक्त दुषित पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होतय व शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खराब होत असुन भविष्यात शेतकऱ्यांच्या शेतात पिके होणार नाही, ही शक्यता नाकार ता येत नाही.
३) क्षेत्रातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची झळ शोस त असुन कंपनी कडुन घाटरोहना,यसंबा येथील ८० % युवकांना कंपनी मध्ये रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे असतांना फक्त २५ ते ३० % स्थानिय लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले आहे.बाकी उर्वरित जागा राजकीय दबावापोटी क्षेत्रा बाहेरील लोकांना रोजगार उपलब्ध करून स्थानिय युवक कामगारांचे शोषण करण्याचे काम होत आहे.
४) गुप्ता कोल वॉशरीला ग्राम पंचायत कार्यालया कडुन नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते मात्र गेल्या काही दिवसांपासुन कंपनी (महामीनरल) नावाने काम करत असल्याने कंपनी विना नाहरकत चुकीच्या पद्धतीने महामीनरल नावाखाली काम करत असल्याने (दि.२६) जुलै ला कंपनी जागे संदर्भात रजिस्ट्री देण्याचे पत्र दिले होते.
अद्याप रजिस्ट्री महामीनरल संदर्भात ग्रा.पं.कार्यालयात सादर केलेली नाही.
५) गुप्ता कोल वॉशरी (महामीनरल) कंपनी मधुन निघणाऱ्या धुळीचा ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, रात्रीला नागरि कांच्या घरात हा धूळ शिरत असल्याने श्वासो़श्वासाच्या त्रासाला स्थानिकांना सामोरी जावे लागत असल्याने लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे.
गुप्ता कोल वॉसरी (महामिनरल) कंपनीने वरील कुठल्याही मागण्याची दखल घेतली नसुन अद्याप कुठलिही मागणी पूर्ण केली नाही, प्रदूषण, रोज गार, आरोग्याचा त्रास स्थानिकांनी सहन करावा, फायदा मात्र बाहेरील लोक घेत असतील तर ग्रा पं घाटरोहना- एसंबा अंतर्गत असलेली गुप्ता कोल वॉश री (महामीनरल) हिला या जागेवरून स्थलांतरित करण्याची मागणी स्थानिय नागरिकांची आहे. करिता पुढील ७ दिवसात मागण्या पूर्ण करा.
अन्यथा (दि. २९) जुलै २०२४ पासुन स्थानिक ग्रामस्थांनी कंपनी गेटपुढे शांततेत अर्ध नग्न आंदोलन करून कंपनीचे आवक जावक (डिस्पेच़) बंद करण्याचे ठरवि लेले आहे.
यात कुठलेही कंपनीचे स्थावर आणि आर्थिक नुकसान झाल्यास कंपनी प्रशासन स्वत: जबाबदार राहील असे निवेदन ग्रा.प.घाटरोहणा सरपंच किशोर बेहु़णे यांनी कंपनी प्रशासनाला इशारा दिला आहे.
सदर निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री,रामटेक क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे,जिल्हाधिकारी नागपुर सह संबधित सर्व अधिका-यांना दिले आहे.