बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे सालाबाद प्रमाणे होत आसलेला श्री संत दानापा महाराज यांचा भंडारा उत्सहामध्ये काल्याची किर्तन सेवा व टाळ आणि मृदुंगाच्या गजरात झाली. संपूर्ण गावामध्ये पालखी घेऊन ग्राम प्रदक्षिणा कढण्यात आली.
मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी संध्याकाळी 8 ते 11 या वेळेत विठ्ठल मंदिरामध्ये आभंग व गवळणीच्या आवाजात ह भ प राम महाराज शेळके यांची कीर्तन सेवा व महाजागर करण्यात आला. तर त्यादिवशी आलेल्या भाविक व वारकऱ्यांसाठी सालाबाद प्रमाणे राहुल होनराव व विशाल होनराव परीवाराच्या वतीने महाभोजनाची व्यवस्था करण्यात आली.
सकाळी 8 ते 10 या वेळेत पांडुरंगाची पालखी घेऊन गावातून दिंडी प्रदक्षिणा करीत प्रत्येक घरोघरी वारकऱ्यांसाठी चहा नाष्टा घेत भाविक आनंद व्यक्त करीत होते. सोंगी भारुडाचा कार्यक्रम भारुडाच्या रूपाने ह भ प तानाजी घाडगे देगाव ह भ प भगवान पवार महुद यांनी भाविकांसाठी आनेक रूपाने चांगला सल्ला दिला.
सोंगी भारुडाने प्रेक्षकांची मने जिंकली हाजारो भाविक भक्त व ग्रामस्थांनी भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला हाजेरी लावली, पिंपरी बुद्रुक गावचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पालखीची ग्राम प्रदक्षिणा झाल्यानंतर ह भ प राम महाराज शेळके यांची नेमाप्रमाणे काल्याची किर्तन सेवा करून दहीहंडी फोडण्यात आली.शेवटी सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप पिंपरी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने करुन दानापा महाराजांच्या भंडाऱ्याची सांगता झाली.
कार्यक्रमाला आलेल्या सर्वच भाविक भक्तांचे हभप महेश सुतार व ह भ प बाळासाहेब घाडगे यांनी आभार व्यक्त केले.