पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- आगामी आरमोरी विधानसभा निवडणुक लवकरच जाहीर होणार असून सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बाधनीच्या कामाले लागले आहेत. यातच खेमराज नेवारे यांनी उमेदवारी लढविण्याची तयारी केली असून त्यांना एका सेवक संघाने व गोंड-गोवारी समाजातील काही सामाजिक संघटनांनी पण या उमेदवारास पाठींबा जाहीर केला असल्याची माहिती प्राप्त सुत्रांची आहे.
समाजामध्ये राजकारणी लोक फक्तं बळ आणि पैसा याचा वापर करून निवडून येत असतात मात्र तळागाळातील सामान्य जनतेला याचा कुठलाही मोठा फायदा होत नसून, फक्त राजकीय पक्षांचे खिसे भरले जातात.
सामान्य जनतेच्या अडचणी, समस्या यांना पायाखाली तुडवून स्वार्थ साधण्याचे काम राजकीय पक्ष करत असतात. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नेवारी यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. नेवारे यांच्या उमेदवारीने राजकीय पक्षांना मोठा धोका होऊन एक तिसरा उमेदवाराकडून वादळ उठणार अस दिसून येत आहे.
आरमोरी विधानसभा क्षेत्रात भाजपा, काँग्रेस, शिवसेना (शिंदे), शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे पक्ष सक्रिय आहेत मात्र सर्व राजकीय पक्षा चे युती असल्याने सर्वच इछुक उमेदवारांमध्ये कलगीतुरा पहावयास मिळणार आहे.
ओढातानीच्या राजकारणात ज्यांच्या कडे स्वतंत्र गट्टन मतदान असेल तोच उमेदवार निवडून येऊ शकतो. एकमात्र खरे खेमराज नेवारी यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने इतर राजकीय पक्षांना मोठा हादरा बसला असल्याचे दिसून येत आहे.