तुम्ही ( लेखकासहीत ) जर,”माणूस असाल……
त्यामध्ये हृदय असेल…..
त्या हृदयात सदसदविवेक बुद्धी असेल…..
आणि जर ती जागृत असेल…..
त्या जागृत सदसदविवेक बुद्धीला या लेखातून माझे काही प्रश्न आणि आव्हान आहेत…
तुम्ही कितीदिवस या राजकारण्यांच्या खेळीला बळी पडणार आहात?
तुमच्यातील माणूस बनण्याच्या व्याख्येतील ऊर्जेचा वापर जाती – धर्माच्या पलीकडे जाऊन कधी करणार आहात?
कोणत्याही राजकीय पक्षातील कोणताही नेता ( कितीही मोठा असो ) तो देशभक्त, संविधाननिष्ठ, लोकशाहीवादी अलीकडच्या 50 वर्षात कधी निर्माण झालाच नाही ( व्ही. पी. सिंग आणि ए. पी. जे. अब्दुल कलाम सरांसारखे काही अपवाद सोडले तर ).!
आज आम्ही म्हणतो की शेतकरी येथील व्यवस्थेने निर्माण केलेल्या आर्थिक व्यवस्थेच्या प्रवाहामुळे निर्माण परिस्थितीमुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कर्जबाजारी होऊन अज्ञानामुळे आत्महत्या करतो.
परंतू,हीच परिस्थिती संपूर्ण देश व राज्यांची झालेली आहे.देशातील सर्वच राज्य सरकारे आणि केंद्र सरकार तुटीच्या अर्थसंकल्पाचे चढत्या क्रमाने गेल्या 50 वर्षात सादरीकरण संसदेत व त्या त्या विधिमंडळात करत आहेत.
अशा काळात आमचे अर्थतज्ञ् किंवा ज्यांना ही आर्थिक संकटाची चाहूल लागलेली आहे, त्यांनी जनतेत जाऊन जागृती करण्यासाठी रान का उठवत नाहीत.उठवत असतील तर त्याचे परिणाम का दिसत नाहीत…?
राजकारण्यांना तर या संकटाचे काहीही घेणे देणे नाही. कारण किती राजकारणी नेते इनकम टॅक्स भरतात……?
उलट ही मंडळी आणि यांच्यासोबत राहून भ्रष्टाचारी नितिभ्रष्ट सनदी अधिकारी व कर्मचारी मंडळी या सर्वांना या देशावर कर्जाचा माऊंट एव्हरेस्ट झाला काय…..
जनता मरता- मरता जगो, किंवा जगता -जगता मरो….
एक दिवस हीच सर्व मंडळी काळ्या पैशाच्या बळावर विजय मल्ल्यासारख्या, मोदी सारख्याच्या मार्गाचा अवलंब करून परदेशात पळून जातील आणि आम्हाला आमच्याच अंतर्गत यांनीच भडकवलेल्या जाती धर्माच्या अराजकतेच्या खाईत लोटून देतील.आणि आम्ही मात्र एकमेकांना संपवण्यासोबतच देशालाही संपवून टाकू….
म्हणजेच या देशाला स्वतंत्र करणाऱ्या क्रांतीकारकांच्या स्वप्नाला पायदळी तुडविणार का…?
ज्यांनी स्वतंत्र देशाला कायमचे स्वातंत्र्य टिकविणासाठी जे संविधान प्रदान केले. त्या संविधानातील प्रास्ताविकेतील आव्हानाला आम्ही कृतीतून कधी सिद्ध करणार ( केवळ दररोज शाळेतून ब्राम्हणांच्या मंत्रासारखी व्यर्थ बडबड करून काय उपयोग ).
जे स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुता,धर्मनिरपेक्षता, समाजवादी या लोकशाही मूल्यांवर देश घडविण्याची जबाबदारी ही केवळ माझीच असून, ती मी अंगीकृत करण्यासाठीच माझा जन्म झालेला आहे. ही जाणीव आमच्यात कधी जागृत होईल?
हे आव्हान तुमच्या सदसदविवेक बुद्धीला आहे….
जागृतीचा लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689..