पारशिवनी ते नरहर रस्त्यालगत पेचकुकडा गावातील पुलिया पाण्याने गेला वाहून…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

 पारशिवनी :- पारशिवनी येथून बाणेरा ते नरहर गावादरम्यान असलेल्या पेचकुकडा गावात गेल्या वर्षभरापासून दोन पुलांचे काम संथ गतीने सुरू आहे.

         शुक्रवारी मध्यरात्री आणि शनिवारी सकाळी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पेचकुकडाच्या बाजूला बांधलेला रस्ता वाहून गेल्याने पारशिवनी ते बाणेरा नरहर रस्ता बंद झाला.

          हा पुलिया ग्रामपंचायत ढवलापूर व ग्रामपंचायत कोलितमारा यांच्यामध्ये तयार करण्यात येत असून, ते अत्यंत संथ गतीने बांधण्यात येत असल्याची मागणी व दोन्ही पुलाच्या कामाची उच्चस्तरिय जाच करण्याची मागणी केली आहे.

          ढवलापुर ग्राम पंचायती च्या सरपंच कु.प्रीती मडावी, मिथुन उईक,माजी सरपंच चंदू भलावी, कोलितमारा सरपंच रामकली उरमाळे व विठ्ठल पाटील, मंगलसिंग उरमाळे व कोलितमारा व ढवलापूर ग्रामस्थांनी यांनी केली आहे.