प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
दीक्षाभुमीच्या विकासाबाबत कर्तव्यात कसूर केल्याबाबत नागपुरचे विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरीसह,जिल्हाधिकारी नागपूर,तद्वतच डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी नागपूर,यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी माननीय विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश वरोरा यांच्या न्यायालयात,संघर्षी विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक,तलाठी, वरोरा(चंद्रपूर) यांनी दाखल केली असून दिनांक २४/०७/२०२४ ला सुनावणी आहे.
अध्यक्ष भदंत आर्य सुरई ससाई यांना वगळता इतर २४ आरोपींवर गुन्हे दाखल करन्यासाठी फौजदारी पीटिशन दाखल केली आहे.
भंतेजीला वगळण्याचे कारण म्हणजे त्यांना आज मराठी,हिन्दी बोलता येत नाही लिहीता येत नाही,त्यांना फक्त बाकिच्या सदस्य यांनी मोहरा बनवून ठेवले असल्याचे विनोद खोब्रागडे यांचे म्हणणे आहे…
दिनांक १४/आक्टोबर/१९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे धम्म दीक्षा घेतली व पाच लाखांचा वर अनुयायी यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
हि धम्म क्रांती भारतातील नाही तर जगातील एकमेव धम्म क्रांती झाली आहे की जिथे रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता धम्म क्रांती म्हणून नोंद घेतली आहे म्हणून ती धम्म भुमी करोडो करोडो बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान आहे.
दिनांक ३१/०५/१९६१ रोजी आमदार सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने व पाठपुराव्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्र सरकारने दीक्षाभूमी,नागपूर भारतीय बौद्ध महासभा या नावाने करन्यासाठी परिपत्रक काढले व महसूल विभाग नागपूर यांना दिले,मात्र त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केले आहे.
त्यानंतर दिनांक ३१/०३/२०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दीक्षाभूमी,नागपूर विकासासाठी १०० करोड रुपयांचा निधी दिला नंतर २०४ करोड रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
परंतु दीक्षाभूमीचा,नावाने सात-बारा ७० वर्षांपासून आजपर्यंत झालेला नाही.तसेच आखीव पत्रिका,प्रापर्डी कार्ड मध्ये सुद्धा दीक्षाभूमी नाव नाही.
दिनांक १६/जानेवारी/२०१९ मध्ये महसूल अधिकारी यांनी व नझुल भुमापन अधिकारी यांनी दीक्षाभूमी,नागपूर या जमिनीला झुडपी जंगल,सडक,रस्ते,इमारत पड,शेती,सरकारी रेकॉर्डला फेरफार करून ७/१२ मध्ये दाखविले व करोडो करोडो बौद्ध बांधवांचा विश्वासघात केला आहे व शासनानची फसवणूक केली आहे.
म्हनुनच दोन कंपन्या,महसूलचे विभागीय आयुक्त नागपूर सह, जिल्हाधिकारी नागपूर,इतर संबंधित अधिकारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी असे २४ आरोपींवर फौजदारी कारवाई करावी व सखोल चौकशी करून तात्काळ FIR रजीष्टर करन्यासाठी माननीय विशेष जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा येथे फौजदारी पीटिशन तलाठी तथा कायदेतज्ञ विनोद खोब्रागडे यांनी दाखल केली आहे व या संबंधाने दिनांक २४/०७/२०२४ ला सुनावणी आहे.
तर दुसरे प्रकरण दीक्षाभूमी नागपूर कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या न्यायालयात ७० वर्षांपासून,कर्तव्यात कसूर करना-या दोषींवर फौजदारी कारवाई साठी फौजदारी पीटिशन दाखल केली असून सुनावणी ३०/०७/२०२४ ला आहे.
फिर्यादी विनोदकुमार खोब्रागडे यांनी महसूल अधिकारी,पोलिस अधिकारी,कमेटीचे पदाधिकारी,कंपन्या यांचावर नेमके केलेले आरोप खालील प्रमाणे..
१)दीक्षाभुमी,नागपूर प्रकरणामुळे भारतातील स्थल सेना,वायु सेना,नव सेना यांचे कर्तव्य बजावताना लक्ष विचलित झाले आहे, भारतीय न्याय संहिता कलम 353 नुसार गुन्हा आहे.
२)महसूल अधिकारी यांनी,शासन निर्णय असतानाही जानीवपुर्वक आकसबुद्धीने निष्काळजीपणा बेजबाबदारपणा लापरवाही हेतुपुस्सरपर कर्तव्यात कसूर केले आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४ नुसार गुन्हा आहे.
३)दीक्षाभुमी,नागपूर या राष्ट्रीय स्मारकाला आरोपीनी विद्रुपीकरण केले आहे, सार्वजनिक मालमत्ता हानीस प्रतिबंध कायदा कलम ३ नुसार गुन्हा आहे.
४) दोन गटागटामध्ये शत्रुत्व निर्माण करणे..
५) दोन गटात तेढ निर्माण करणे..
६) राष्ट्रीय एकात्मतेला बंधनकारक असे कृत्य करणे…
७) देशात शांतता भंग करणे..
८) बौद्ध समाज बांधवांचा धार्मिक भावना दुखावणे…
९) सार्वजनिक आगळीक करण्याचा प्रयत्न करणे..
१०)एका वर्गातुन दुसऱ्या वर्गात तंटा लावन्याचा प्रयत्न करणे..
११) दोन गटात दंगा फसाद निर्माण करन्याचा प्रयत्न करणे,हे सर्व काम आरोपी यांनी बोगस सरकारी रेकॉर्ड ७/१२ व आखीव पत्रिका प्रापर्डी कार्ड तयार करून केले आहे..
म्हणून आरोपी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी पीटिशन व्यथित होऊन,एक जबाबदार व जागृत नागरिक म्हणून दाखल केलो आहे असे म्हणणे विनोद खोब्रागडे यांचे आहे.