राष्ट्रवादी ओबीसी महिला कांग्रेसच्या अहमदनगर शहर जिल्हा उपाध्यक्षपदी गौरी दिलीप दुमाने याची निवड….

प्रितम जनबंधु 

    संपादक 

      अहमदनगर शहरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी दिलीप दुमाने याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा रेणुका पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी महिला अहमदनगर शहर जिल्हा उपाध्यक्षपदी आ संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देऊन निवड करण्यात आली.

           अहमदनगर शहर राष्ट्रवादी महिला ओबीसी काँग्रेसच्या जिल्हा उपध्यक्षापदी सामाजिक कार्यकर्ता गौरी दिलीप दुमाने यांची राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा सुनिलजी तटकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार संग्राम भैय्या जगताप यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील रहाल. पक्ष बळकटीसाठी व महिला संघटन मजबूत करण्यासाठी, पक्षाची ध्येय, धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.  

               तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध महिला सेलच्या पदाधिकारी यांच्याही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा रेणुका पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी अहमदनगर येथे आ संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देऊन निवडी करण्यात आल्या आहेत.

                  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष रेशमा ताई आठरे, श्रमीक सेल अध्यक्ष रंजनाताई उकरडे, उर्मिला काडे, सर्धा जाधव व महिला पदाधीकारी उपस्थीत होते.