रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी वर्धा/यवतमाळ
वर्धा :- सामाजिक बंधुभाव, एकता, अखंडता यावर भाष्य करणारे अनेक व्यक्ती सर्वत्र आढळतात मात्र हा आशय घेऊन आस्थेने पाऊल उचलणारे समाजात क्वचितच आढळून येतात. मात्र या शहरात या विषयाशी बांधिलकी जोपासणारे सामाजिक समरसतेची आंतरिक तळमळ असणारी व्यक्ती म्हणजे प्रकाश खंडार होय.
प्रकाश खंडार प्रसिद्धीच्या दूर राहून सामाजिक उत्कर्षाची उन्नतीची आणि आपल्या बंधुत्वाच्या भावनेची बीज रुपणारी ही व्यक्ती जीवन जगण्याचा एक नवा अर्थ दर्शविणारी ठरते असे प्रतिपादन समाजसेवी पवन तिजारे यांनी व्यक्त केले.
ते स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्हा द्वारा आयोजित संघटनेचे संचालक सभासद तथा ज्येष्ठ समाजसेवी प्रकाश खंडार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी 14 जुलै रोजी सत्येश्वर हॉल येथे बोलत होते.
याप्रसंगी स्पोर्ट कराटे असोसिएशनचे जिल्हा संरक्षक इमरान राही, उपाध्यक्ष मोहन मोहिते, आयोजक तथा सचिव मंगेश भोंगाडे, संचालक सभासद गंगाधरजी पाटील, भगवानदास आहूजा, शाम पठवा, कार्याध्यक्ष संतोष सेलूकर, कोशाध्यक्ष विजय सत्याम, सभासद निखिल सातपुते, प्रवीण पेठे, सहसचिव हरीश पाटील, कार्यालय प्रमुख सुशांत जीवतोडे व इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सौ. कल्याणी भोंगाडे यांनी तर आभार पूजा गोसाटकर यांनी मानले.