मुस्लिम समाजाच्या वतीने खिचड्याचे वाटप..  — दरवर्षी प्रमाणे यंदाही पारशिवनी जामामशिद जवळ झाले खिचड्याचे उत्साहात वाटप..

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- पारशिवनी शहरात मोहरमच्या प्रारंभाच्या निमित्ताने इस्लामच्या नवीन वर्षाची सुरुवात मोहरम महिन्यापासून होते.

          म्हणजेच मोहरम हा महिना इस्लामी वर्षाचा पहिला महिना आहे.करबला येथील 10 वा,मोहरम हा करबलाच्या 72 शहीदांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

        करबलाच्या लढाईने जगाला संदेश दिला की,सत्याचा नेहमी विजय होतो आणि खोट्याचा पराभव होतो,हा संदेश देत पारशिवनी मुस्लिम जमातच्या वतीने ९ तारखेला जामा मशिदी जवळ दरवर्षीप्रमाणे यंदाही खिचड्याचे आयोजन करण्यात आले होते.

         ज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक अत्यंत मनमिळाऊआहेत आणि सर्वांचे सहकार्य लाभते.यावेळी मौलाना रफिक साहेब,याकुब शेख,बबलू शेख,नासीर पठाण,जलीम शेख,अज्जू पठाण,अहबाज पठाण,अफरोज खान,खलील पठाण,मोनू,निसार शेख,अर्शद शेख,रायपूरकर,बघाडे,नजीब शेख,अरमान शेख,आ.बशीर शेख,अयान शेख,असीम शेख,अमन शेख फैज बघडे,सोनू शेख नजीब शेख,रेहान शेख,बाबा शेख,जावेद पठाण,शादाब, शारिक,रेहान,अयान सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि सर्व देशवासियांसाठी शांतता आणि शांतता यासाठी प्रार्थना केली.