कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:- रविवारला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची बैठक खळतकर सभागृह पारशिवनी येथे घेण्यात आली.
श्री.राजेश देशमुख अध्यक्ष व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीचे संचालन श्री.भाऊरावजी कुरळकर सचिव अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी केले.
बैठकीमध्ये मागील काळात झालेल्या विषयांवर यथावत प्रमाणे संबंधित विभागांना निवेदन देण्याचा ठराव एकमताने संमत झाला.तसेच पारशिवनी शहरातील बस स्थानकावरील नागरिकांची गैरसोय, पावसाळ्याच्या अनुषंगाने शहरातील विविध ठिकाणी पावसाच्या साचणाऱ्या पाण्याचे नियोजन,तसेच शहरातील बँकां मधील सुविधांचा अभाव अन्य विषयांवर निवेदन देण्याचे ठराव घेण्यात आले आहे.
सदर बैठकीस श्री.राजेश देशमुख – तालुका अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत,श्री.भाऊरावजी कुरळकर तालुका सचिव अखिल भारतीय ग्राहक पंचायत पारशिवनी तालुका,श्री.रघुनाथजी पुंडे- तालुका उपाध्यक्ष,श्री.विठ्ठलजी गांजरे – तालुका संघटन मंत्री,श्री.विजयजी जयस्वाल- विज सल्लागार,विजयजी भरणे,राजेशजी आमदे,वामनजी बागडी,चक्रधरजी खेरगडे,नरेशजी चौधरी,अशोकजी वलुकर व अन्य सदस्य उपस्थित होते.