जीवन,जन्म -मृत्यूच्या दरम्यानचा काळ…  — कायदेमंडळ,कार्यकारीमंडळ,न्यायमंडळ,पत्रकारिता यांनी घटनात्मक आणि नैतिक कर्तव्याला तिलांजली दिली? — भाग – ४

        51 ते 60 वर्षाच्या वयात प्रत्येकजण निसर्गनियमानुसार वैचारिक आणि आचारिक परिपक्वता अविष्कारीत झालेला असतो. दूरदृष्टीचा विचार करून कौटुंबिक,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,सांस्कृतिक,आर्थिक,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय इत्यादी क्षेत्रात कायमस्वरूपी टिकणारे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीची सुरुवात करतो. 

       त्यासाठी इतरांना त्यांच्या सदसदविवेक बुद्धीला जागृत करून तशी कृती करायला भाग पाडतो. लोकांना निशस्त्र जमवून त्यांच्या सदसदविवेक बुद्धीला सम्यक मार्गाने वळविण्यासाठी भाग पाडतो.म्हणजेच एक सच्चा,

“भारतीय नागरिक बनतो…..

       हीच अपेक्षा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आमच्याकडून व्यक्त केली होती.त्यासाठीच तर अनुच्छेद क्रमांक 19 ( क ) चा समावेश त्यांनी संविधानात केलेला होता.!

        अशा रीतीने तयार झालेला नागरिक आपल्या खांद्यावर देशाचे ओझे वाहन्यास तत्पर असतो.परंतू अशा नागरिकांचा समूह निर्माण झाला तर त्या एकट्याचे ओझे हलके होते आणि देश व समाज एका सर्वार्थाने आणि सर्वांगीणदृष्ट्या सूसांस्कृतिक होऊन जगात आदर्श भारत म्हणून विकसित पावतो….

      कारण या वयातच प्रत्येक भारतीय नागरिक सत्य – असत्य, कुशल – अकुशल,चांगले – वाईट, खरे – खोटे यांची पारख करण्यात वैचारिक आणि आचारिकदृष्ट्या सक्षम असतो. 

       त्याचप्रमाणे आपल्या देशातील तत्ववेत्ते आणि महापुरुष यांच्या जीवनातील त्याग,संघर्ष,निःस्वार्थपणे जीवन समर्पणाला सहज समजून घेऊ शकतो.आणि त्यांच्या अर्धवट राहिलेल्या समाज व देशसेवा पूर्ण करण्यासाठी क्षणात तत्पर होतो….. 

       अशा विचाराने प्रगल्भ झालेला नागरिक खरा भारतीय सर्वसामान्य नागरिक असतो.त्यासाठी तो कुठल्याही प्रकारच्या शरीराला अपायकरक असणाऱ्या व्यसनापासून कोसोमैल लांब असतो.शिवाय केंद्र व राज्यसरकारे सुद्धा अशा नागरिकांची निर्मिती करण्यासाठी Connecting 100% देश चालविण्यासाठी नेहमी तत्पर असतात. 

         शिवाय कायदेमंडळ ( विधिमंडळ आणि संसद ) सुद्धा यासाठीच कायद्याची निर्मिती करते. कार्यकारीमंडळ ( केंद्रसरकार आणि सर्वच राज्यसरकारे ) सुद्धा या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करते.

       यामध्ये कसूर झालाच न्यायमंडळ ताबडतोब निकाल न देता न्याय देते. शिवाय लोकशाहीचा चौथा अदृश्य आधारस्तंभ या तिन्ही लोकशाहीचे आधारस्तंभ जर घटनात्मक आणि नैतिक कर्तव्यापासून फारकत घेत असतील तर त्यांच्याविरुद्ध जनतेत निर्भीडपणे जागृती करण्याचे नैतिक कर्तव्य हा चौथा आधारस्तंभ म्हणजे..

 “पत्रकारिता,पार पाडतो…..

       नव्हे हे त्याचे घटनात्मक व नैतिक कर्तव्यच आहे!..

      परंतू गेल्या 75 वर्षात वरील व्याख्येनुसार येथील व्यवस्थेने ( कायदेमंडळ, कार्यकारीमंडळ, न्यायमंडळ आणि पत्रकारिता ) घटनात्मक व नैतिक कर्तव्याला तिलांजली दिल्यामुळे वरील व्याख्येनुसार भारतीय नागरिक तयार होऊ शकला नाही.हे वास्तव नाकारता येत नाही!..

     त्याचे मुख्य कारण म्हणजे या देशावर पावणेचार हजार वर्षांपूर्वी झालेल्या साम,दाम,दंड आणि भेदाच्या कुटनीतीचे कुसंस्काराचे आर्यांचे ( आताच्या ब्राम्हणांचे ) अतिक्रमण होय. यांची कुटनीती ही प्रथम सर्वच राजकीय पक्षांनी अमलात आणली. 

         त्यानंतर त्याचा शिरकाव कार्यकारीमंडळात झाला,नंतर कायदेमंडळात झाला,त्यानंतर न्यायमंडळात झाला. त्यानंतर पत्रकारितेत घुसला.शेवटी सर्वसामान्य जनतेत त्याने शिररकाव करून घराघरात घुसला.एवढेच काय एका शरीराचे त्याने दोन तुकडे केले. 

       म्हणून आमचा देश या राजकारण्यांनी व राजकीय पक्षांनी या कुटनीतीला जवळ केल्यामुळे सर्वच देश क्षेत्रात मागे पडून भयानक अशा डेंजर झोनमध्ये जात आहे.विशेष म्हणजे आर्थिक क्षेत्रात देशावर आणि सर्वच राज्यसरकार यांच्यावर कर्जाचा माऊंट एव्हरेस्ट झाल्यामुळे दरडोई लाखो रुपयाचे कर्ज झाल्यामुळे आमचा शेतकरी आणि जनता,महागाई आणि बेरोजगारी यांना तोंड देत देत जगता – जगता मरत आहे आणि मरता – मरता जगत आहे. 

       कारण केंद्रसरकार आणि सर्वच राज्यसरकारे यांनी काढ कर्ज कर भ्रष्टाचार यातून केवळ श्रीमंतांनी श्रीमंतच व्हावे गरिबांनी गरीबच व्हावे. अशा बनलेल्या प्रवाहात आम्ही ( भारतीय जनता ) किती दिवस वाहत जाणार…..?

        या प्रश्नाचे उत्तर म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही.आज, आता,ताबडतोब या क्षणापासून भारताच्या संविधानाला समजून घ्या त्यातून जागृत व्हा.दुसऱ्यांना जागृत करा.आणि एक भारतीय नागरिक वरील व्याख्येनुसार बना…

        अन्यथा याच व्यवस्थेने बनविलेल्या असंविधानिक मार्गाने वाहत जाऊन आपल्या लेकरांना आणि नातवाना त्याच प्रवाहात ढकलून देऊन भावी पिढीचे खुनी आणि गुन्हेगार व्हा.

     जागृतीचा आचारिक लेखक

              अनंत केरबाजी भवरे

    संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689…