प्रितम जनबंधु
संपादक
ब्रम्हपुरी:- नेवजाबाई हीतकारीनी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे “अधिकारी आपल्या दारी” या उपक्रमाअंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
“अधिकारी आपल्या दारी” तथा स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य जी एन रणदिवे सर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पी.एस.आय. भारत कवर तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य के. एम. नाईक, विद्यालयाचे पर्यवेक्षक ए. डब्लू. नाकाडे, मुनिराज कुथे आदी मान्यवर व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करून कठोर परिश्रम घेतले तर आणि तरच जीवनात यश संपादन करता येतो. आपल्याला कुठलीच वाट अवघड नसते तर येणार्या संकटावर मात करुन कठोर परिश्रमाने यशाची सुखद वाटचाल करता येऊ शकते असे प्रतिपादन पी.एस.आय. भारत कवर यांनी केले. ते स्थानिक नेवजाबाई हितकारीनी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
आपल्या मार्गदर्शनात कवर पुढे बोलताना म्हनतात विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळवून वेळेचे योग्य नियोजन, कठोर परिश्रम, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि संयम बाडगुन सतत अभ्यास करावा असा यशाचा कानमंत्र त्यांनी दिला. तद्वतच विद्यार्थ्यांनी परिस्थीचा उगाच बाऊ करू नये, मी सुद्धा छोट्याश्या पत्र्याच्या खोलीत राहून अभ्यास केला आहे असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य रणदिवे यांनी “अधिकारी आपल्या दारी” या अभिनव उपक्रमाचा मुख्य उद्देश पटवून सांगत विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी आणि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुनीराज कुथे यांनी केले. उत्कृष्ट सूत्रसंचालन लक्ष्मण मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपप्राचार्य के.एम.नाईक यांनी केले.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित राहुन मार्गदर्शनाचा लाभ घेतला.