शिवसेना (उ.बा.ठा.)ने दिले निवेदन.. — तहसील कार्यालय,सार्वजनिक व जिल्हापरिषद बांधकाम विभागाकडे लागले जनतेचे लक्ष..

     राकेश चव्हाण 

तालुका प्रतिनिधी कुरखेडा..

       “गोठनगाव -मालदुगी- आंधळी -चिखली फाटा तसेच खैरी -बेलगाव नवरगाव-आंधळी -चिखली फाटा या रोड वर तात्काळ डांबरीकरण करा.

          कुरखेडा येथील सती नदी वर नवीन पुल मंजूर झाल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने ऐन पावसाळ्यात दोन महिन्या पूर्वी जुन्या पुला ला पाडले.

        पर्याय रस्ता म्हणून रहदारी साठी बाजूला रपटा बनविण्यात आला.परंतु रपटा पहिल्या पाऊसा च्या पुरा ने वाहून गेला.त्यामुळे आसपासच्या शंभरच्या जवळ पास गावातील लोकांचा रहदारीचा मार्ग बंद झाला आणि कुरखेडा सती नदीच्या पुलावरून होणारी रहदारी ट्रॅफिक बस,चार चाकी,दुचाकी वाहनाची होणारी रहदारी गोठनगाव,मालदुगी, आंधळी,चिखली फाट्यावर व दुसरा मार्ग खैरी,बेलगांव,नवरगाव,आंधळी, चिखली,फाटा वर वळविण्यात आली.

       पूर्वीच हे दोन्ही रस्ते जुने असल्याने गीट्टी बोल्डर निघालेले गड्डे पडलेले होते.अधिकची वाहतूक सुरू झाल्याने रस्ते पूर्णत: खराब होत आहेत.यामुळे दोन्ही मार्गावर तात्काळ डांबरी करण करण्यात यावे याकरिता शिवसेना (ऊ.बा .ठा)च्या वतीने उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग कुरखेडा,काही रस्त्याचा भाग जिल्हा परिषद अंतर्गत येत असल्याने तहसीलदार कुरखेडा,उपविभागीय बांधकाम विभाग जिल्हा परिषद कुरखेडा याना निवेदन शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

      श्री धनबाते नायब तहसीलदार,श्री.गिरनाळे उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग कुरखेडा,श्री.धार्मिक जिल्हा परिषद बांधकाम विभाग कुरखेडा यांना निवेदन देताना सर्व स्थिती अवगत करून देण्यात आली.

        या प्रसंगी उप तालुका प्रमुख ग्रामीण दशरथ लाडे,आंधळी सामाजिक कार्यकरते प्रलाद पाटील खूने, आंधळी कामगार सेना तालुका प्रमुख डॉ.अनिल ऊइके,तालुका संघटक राकेश चव्हाण उपस्थित होते.