लोकसंख्या वाढीची समस्या सर्व समस्यांची जननी आहे- प्रा.डाॅ. कामडी..    

    रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी

        चिमूर – स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय,चिमूर येथे विद्यार्थी विकास विभाग,लोकसंख्या विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 11 जुलै ला जागतिक लोकसंख्या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. 

       या कार्यक्रमात बोलताना वाणिज्य विभागांचे प्रा.डाॅ. लक्ष्मण कामडी म्हणाले की,जगात भारत हा देश जागतिक लोकसंख्येत क्रमांक एक आहे.भारतात लोकसंख्या वाढल्यामुळे आर्थिक,शैक्षणिक, सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहे.

           ह्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी पुढे आले पाहिजे. छोट्या कुटुंबासाठी समाजानी पुढाकार घेतला पाहिजे असे सविस्तर सांगितले. 

            या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.प्रफुल्ल बन्सोड होते.त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की,लोकसंख्या वाढली की मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी येतात.प्रसार माध्यमांनी लोकसंख्या समस्या विषयी गंभीरपणे जाणीव जागृती करायला हवी आहे.तरुणानी ग्रामीण भागात जाऊन लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सांगितले पाहिजे. 

       कार्यक्रमाला वाणिज्य विभागांचे प्रा.हरेश गजभिये,समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.पितांबर पिसे,शारिरीक शिक्षा व क्रिडा संचालक डॉ.उदय मेंढूलकर तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.प्रफुल राजुरवाडे,प्रा.डॉ.नितिन कत्रोजवार उपस्थित होते.

          लोकसंख्या विभागाचे समन्वयक डॉ.राजेश्वर रहांगडाले यांनी आपल्या प्रास्ताविकात लोकसंख्या समस्या विषयी सविस्तर अभ्यासपूर्वक माहिती दिली.

        सूत्रसंचालन इंग्रजी विषयाचे विभाग प्रमुख प्रा. आशुतोष पोपटे यांनी केले.आभार शारिरीक शिक्षण संचालक डॉ.उदय मेंढूलकर यांनी केले.या कार्यक्रमाला रासेयो स्वयंसेवक व लोकसंख्या शिक्षण मंडळाचे विद्यार्थी उपस्थित होते.