आई वडिलांचे छत्र हरवलेल्या माहीला डॉ.सतिश वारजुकर यांचे कडून औषधोपचारासाठी आर्थिक मदत… — मनात जिद्ध आणि पाठीशी आई वडिलांची पाठराखण असली की,माणूस कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास सज्ज असतो…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

      खडसंगी येथील माही या चिमुकल्याचे आई वडील आजाराने दूर्धर छत्र हरवले.त्यानंतर आजी माजी सरपंच यशोधा तराळे यांनी त्यांना लहान्यांचे मोठे केले.

        परंतु माहीची अचानक प्रकृती बिघडली.तिला दवाखान्यात भरती करण्यात आले.

       ती दीर्घ आजाराने त्रस्त आहे.आजीने जवळे पैसे लावून तिच्यावर उपचार सुरु ठेवला.मात्र आर्थिक अडचण निर्माण झाली असता,त्यांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिश वारजूकर यांच्याकडे उपचारा संबंधाने धाव घेतली. 

         चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.सतिश वारजूकर यांनी खडसंगी येथे जाऊन माहीच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली.

         यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस गजानन बुटके,तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ.विजय गावंडे,काँग्रेस कार्यकर्ते रुपचंद शाश्त्रकार,बबन कुबडे,इरफान पठाण,उमेश बोमेवार,नंदू नागोसे,उपस्थित होते.