एकलव्य निवासी शाळेतील कंत्राटी शिक्षकांना व अधिक्षकांना सेवेत सामावून घेण्याची मागणी…  — खासदार डॉ.नामदेव किरसानला दिले निवेदन…

      रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर:- एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील कंत्राटी शिक्षकांना व अधिक्षकांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे, असे निवेदनात म्हटले आहे की,केंद्रीय आदिवासी विकास विभाग व आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल निवासी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

            राज्यातील काही भाग सोडला तर, सर्वच भाग हा पेसा क्षेत्रातील आहे.नागपूर विभागात एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी स्थानिक भागातील भरलेले होते. पेसा क्षेत्रातील सद्यःस्थितीत सर्वच विभागातील नोकरभरती स्थगित असताना एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील जुन्या कंत्राटी शिक्षकांची व अधिक्षकांची सेवा समाप्त करून याठिकाणी बाहेरील राज्यातील शिक्षकांना व अधिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. ही भरती पेसा नियमांना धरून आहे का,असा प्रश्न निवेदनात उपस्थित केला आहे.

           जुन्या कंत्राटी शिक्षकांवर व अधिक्षकांनवर अन्याय झाला असून परराज्यातून आलेले अन्य भाषिक शिक्षक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्थानिक भाषेत संवाद साधणार कसा, शिवाय नियुक्त केलेल्या शिक्षकांची भरती प्रक्रियावर साशंकता आहे.

           अनेक वर्षांपासून परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचे व अधिक्षकांचे भवितव्य अंधारात आले असून त्यांचे कुटुंब रस्त्यावर येणार आहे.अनेकांचे नोकरीला लागण्याचे वय देखील संपले आहे.

              एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील कत्राटी शिक्षकांच्या व अधिक्षकाच्या नियुक्तीबद्दल गांभीर्याने विचार करून जुन्याच स्थानिक शिक्षकांना व अधिक्षकांना सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी समाज कार्य पदविधर कल्याण मंडळ जिल्हा शाखा चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष अक्षय लांजेवार यांनी खासदार डॉ.नामदेव किरसान यांना निवेदनातून करण्यात आले आहे.