चिमूर विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित बाबींना प्राधान्य :- खासदार नामदेव किरसान…

     रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि

चिमूर:-

            चिमूर- गडचिरोली लोकसभा क्षेत्रात अनेक बाबी प्रलंबीत आहेत यात सिंचन, रेल्वे, रस्ते, घरकुल योजना विहीर, या कामाना प्राधान्य देऊन सोडविण्यात येतील. जी कामे प्रलंबीत आहेत ती कामे पूर्ण करण्यासाठी प्रर्यत्नशिल आहे. शासकिय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरीका पर्यंत पोहचला पाहीजे, सिंचन तथा पिन्याच्या पान्याची समस्सा मोठ्या प्रमाणात आहे. मनरेगा कामाचे मजुरांचे पैसे लवकर मिळाले पाहीजे, घरकुलाचा लाभ गरजुना मिळाला पाहीजे, शेतीसाठी मार्गदर्शन कृषी विभागाने करणे गरजेचे आहे. अधिकारी मोगमपणे माहीती सांगतात ती प्रत्यक्ष तपासली जाईल, अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना खासदार नामदेव किरसान यांनी दिल्या. ते चिमूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

            चिमुर – वरोरा नॅशनल हायवे चे काम अपूर्ण का? यावर नॅशनल हायवे विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन प्रश्न सोडविन्यात येईल. सरडपार गावचा प्रश्नावर उत्तर देताना शासन आणि प्रशाशनाची झालेली चूक त्यांनी वेळीच दुरुस्त करायला हवी होती. मात्र दप्तर दिरंगाईने सरडपार वासीयांना यातना भोगाव्या लागत आहेत हि बाब प्रशासनाकडे लाऊन धरणार, मुरपार येथील कोळसा खान का बंद पडली यावर सविस्तर बाबी तपासून घ्यावे लागेल असेही त्यांनी सांगितले.

           यावेळी डॉ. सतीश वारजुरकर सरडपार गावाच्या प्रश्नावर तसेच इंदिरा नगरच्या समस्येवर स्थानीक लोकप्रतीनिधीवर टिका करीत कोणतीही समस्या सोडविन्यासाठी एका वर्षेच्या कालावधीत सोडविता येतात मात्र मनात नसले तर अनेक वर्षे लागतात सिमेन्ट रस्ते, सभागृह म्हणजे विकास होय काय? असा प्रतीप्रश्न उपस्थीत करून सरडपार गावाला आठ वर्षांत कोणत्याच ग्राम पंचायतमध्ये सामावून घेतले नाही. कारण तिथे दलीत आदिवासी बांधव रहातात म्हणून दप्तर दिरंगाई चालू असल्याचे मत व्यक्त केले.

          यावेळी डॉ. अविनाश वाजुरकर, विजय गावंडे तालुका अध्यक्ष चिमुर, माधव बिरजे, गजानन बुटके, अविनाश अगडे, प्रशान्त कोल्हे, प्रा. राम राऊत, पप्पु शेख, विवेक कापसे सह काँग्रेस पदाधीकारी उपस्थित होते.