तनुजा नागदेवे कलाक्षेत्र 2024 पुरस्काराने सन्मानित…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

          साकोली – येथील रहिवासी तनुजा अमित नागदेवे या दहा वर्षापासून फुले, शाहू ,आंबेडकर यांच्या विचारधारा आपल्या तनुजा भिमगीत गायन मंडळ व कव्वाली च्या माध्यमातून भंडारा व गोंदिया जिल्ह्यात प्रबोधन सुरू आहे. व भविष्यात फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा प्रचार व प्रसार पूर्ण विदर्भात करणार आहेत.

           या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई शाखा भंडारा-गोंदिया तर्फे गोंदिया येथील उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांच्या दालनात त्यांना शाल, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

          याप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर टेंभरे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी जी रंगारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले.

           त्यांच्या या पुरस्काराबद्दल भंडारा वंचित बहुजन आघाडीचे भंडारा जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले, गोंदिया जिल्हाध्यक्ष बनसोड, विनोद मेश्राम, गोंदिया महिला जिल्हाध्यक्ष किरण फुले, लाखनी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष श्रीकांत नागदेवे,यादोराव गणवीर, जगदीश रंगारी,अमित नागदेवे, त्रिवेणी मेश्राम ,रेखा रामटेके प्रशिक मोटघरे , गणेश गजभिये, शीतल नागदेववे इतर कार्यकर्त्यांनी चा त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.