रामनगर परिसरात घरफोडी करणारे तीन चोरटे कन्हान पोलीसांच्या ताब्यात. — दुचाकी वाहन,सोन्याचे दागिन्यांसह एकुण ९८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त..

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

   कन्हान : – कन्हान शहरातील रामनगर तिवाडे ले-आऊट येथे घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना कन्हान पोलीसांनी पकडले असून त्यांचा जवळुन गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहन आणि सोन्याची अंगठी व नथ,असा एकुण ९८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून कायदेशीर कारवाई केली आहे.

         राजेंद्र हटवार हे आपल्या पत्नी व दोन मुलासह सोमवार दि.(२४) जुन ला संध्याकाळी ४ वाजताच्या दरम्यान गडचिरोली येथे गेले होते.दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता घरी परत आल्यावर त्यांना घरातील लाईट चालु दिसले आणि मागचा दरवाजा उघडा दिसला.

        घरात जाऊन पाहणी केली असता घरातील सामान अस्तव्यस्त पडले होते आणि आलमारी उघडी होती.पाहणी केली असता आलमारी मध्ये ठेवेलेले सोन्याची अंगठी व नथ असा एकुण १८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेले असल्याचे लक्षात आले.तदनंतर त्यांनी पोलीस स्टेशन पारशीवनी येथे तक्रार दाखल केली होती.

         यामुळे राजेंद्र हटवार यांचा तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान,हेड कांस्टेबल हरिष सोनभद्रे,सचिन वेळेकर,नापोशि अमोल नागरे,पोशि अश्वीन गजभिये यांनी घटनेची सहानिशा करुन व सीसीटीवी फुटेजची पाहणी करुन गुन्ह्यामध्ये आरोपी १) तुषार ऊर्फ नाईंटी तुलशीदास वानखेडे (वय २८) , २) रोशन प्रकाश ढोके (वय २६) , ३) विधिसंघर्ष बालक तीघेही रा.कन्हान यांना पकडुन विचारना केली असता गुन्हा केल्याचे कबुल केले.

        पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहन क्रमांक एम.एच.४०,बी.वाय.०७२८ किंमत ८० हजार रुपए आणि सोन्याची अंगठी व नथ असा एकुण ९८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना कारागृहात बंद केले.