रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
जिल्हा परिषद शाळेचे नविन शैक्षणिक सत्र सुरु झाले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी १ ते ४ तर काही ठिकाणी १ ते ७ पर्यंत वर्ग असलेल्या जि.प.शाळा आहेत.
परंतु या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन त्यांच्या बौध्दीक क्षमतेवर परिणाम होत आहे.
त्यामूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी शिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी डॉ. सतिश वारजूकर यांनी केलेली आहे.
प्रत्येक गावात विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मिळावा यासाठी सरकारणे गावा-गावात जिल्हा परिषद शाळेची निर्मीती केलेली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडावे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जावू नये विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्यात यावे भावी पिढीला ज्ञान मिळावे हे सर्व उद्देश ठेवून या शाळांची निर्मीती झालेली आहे.
परंतु प्रत्येक शाळेत शिक्षकांची आज कमतरता जाणवत आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्ग १ ते ४ वर्गापर्यंतच्या शाळेत एक किंवा दोनच शिक्षक आहेत.
तर ज्या गावात १ ते ७ वर्ग आहेत त्या शाळेवर दोन ते तिन शिक्षक आहेत.या १ ते ४ पर्यंतचा वर्गासाठी मात्र काही ठिकाणी एक शिक्षक तर काही ठिकाणी दोन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केल्या जावू शकत नाही.
जिल्हा परिषद शिक्षकांवर शिकवण्यापेक्षा ईतर कामांचे ओझे जास्त पडू लागले आहे जनगणना,निवडणूकीचे कामे शिक्षकांकडून करून घेतली जात आहेत तसेच मतदार पुनर्निरीक्षण,बिएलओ या कामांचाही तान शिक्षकांवर दिल्या जात आहे.त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या होत आहे एका शिक्षकावर वर्ग १ ते ४ शिकविण्याची वेळ आलेली आहे.
त्यामूळे विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक ज्ञान मिळत नाही त्यामूळे जि.प. शाळेचा शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे. शिक्षण विभागाने केवळ शिक्षण व अध्यापनावर लक्ष केंदित केले आणी इतर कामासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारल्यास शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळेल व त्यांची बौध्दीक क्षमता वाढण्यास मदत होईल त्यासाठी अशा शाळेत शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी डॉ. सतिश वारजूकर यांनी केलेली आहे.